क्रेडिट कार्डचा योग्य वापर

November 2, 2008 6:00 PM0 commentsViews: 153

क्रेडिट कार्डचा योग्य वापर खरेदी करताना सध्या क्रेडिट कार्डचा सर्रास वापर केला जातो. सध्या अनेकजण रोकड स्वत:कडे बाळगण्याऐवजी कार्डचा वापर करताना दिसतात. हया प्लॉस्टिक मनीचा वापर कसा करायचा. त्या कार्डाचे किती प्रकार आहेत. त्याचा वापर कसा करायचा यासर्वांची माहिती फायनान्स प्लॅनर विश्राम मोडक यांनी श्रीमंत व्हा या कार्यक्रमात दिली. विश्राम मोडक सांगतात, बाजारात स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्ड आहेत.क्रेडिट कार्ड म्हणजे, तुम्हाला काही रक्कम व्याजावर दिली जाते. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमचं ते उधारीचं खातं असतं. तुमच्या कार्डावर जितके पैसे असतात. तेवढयाच पैशाची तुम्ही खरेदी करू शकता. जो व्यक्ती सतत बाहेर असतो वा परदेशात ज्याला सततचे व्यवहार करायचे असतात,अशांनी क्रेडिट कार्ड घ्यावीत. आपल्या मित्रांकडे, नातेवाईकांकडे कार्ड आहे म्हणून क्रेडिट कार्ड घेऊ नयेत. क्रेडिट कार्डवर 24% ते 36% इतकं व्याज आकारण्यात येतं. तुम्हाला चेकने पैसे भरायचे असल्यास शेवटच्या तारखेच्या आधी दिवस तुम्ही चेक दिला पाहिजे. शेवटच्या दिवशी चेक दिल्यास त्यावर व्याज आकारलं जातं. डेबिट कार्ड म्हणजे तुम्ही तुमचेच जमा केलेले पैसे खर्च करू शकता. परंतु त्या खरेदीच्या ठिकाणी तुमच्या कार्डातून पैसे काढण्याची सोय असली पाहिजे तर एटीएम कार्डद्वारे तुम्ही जमा केलेल्या बॅकेच्या कुठल्याही शाखेतून जमा केलेले पैसे काढू शकतो. तुम्ही जेव्हा कोणत्याही कार्डाचा वापर करता. त्यावेळी त्यावेळच्या व्यवहाराची नोंद तुम्ही जरूर ठेवा, अशी उपयुक्त माहिती विश्राम मोडक यांनी या कार्यक्रमात दिली.

close