घरातली बाग – नर्सरी तज्ज्ञ लीना लोबो

November 3, 2008 12:14 PM0 commentsViews: 167

सिझनप्रमाणे झाडांना खत पाणी घालण्याचं प्रमाण बदलतं. हिवाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यावी आणि नवीन झाडे कोणती लावावीत याविषयी नर्सरी तज्ज्ञ लीना लोबो यांनी 'टॉक टाइम'मध्ये माहिती दिली. झाडांची काळजी कशी घ्यायची यावरही त्यांनी काही टीप्सही दिल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे – 1. हिवाळ्यात झाडांना शेणखत घालावं.2. फुलझाडांसाठी डायनामिक लिफ्टर/संपूर्ण खत वापरावं.3. झाडांना दर 15 दिवसांनी खत घालावं.4. झाडांच्या बाजूची माती चांगली खुरपून मग खत घालावं.5. झाडांच्या बाजूची माती चांगली खुरपून मग खत घालावं.6. 10 इंचाच्या कुंडीसाठी 1 चमचा खत घालावं.7. झाडांवर कीड पडली असेल तरच कीटकनाशकांचा वापर करावा.8. किडीप्रमाणं वेगवेगळी कीटकनाशकं असतात.9. मुंग्यांसाठी वेगळी कीटकनाशकंअसतात.10. थंडीत झाडांना पाणी कमी लागतं.11. माती ओली होईपर्यंतच पाणी घालायचं.12. झाडांची छाटणी नियमित करा.13. मोगरा, जाई, जुई, लिली आणि फुलझाडांची लागवड हिवाळ्यात करतात.14. लॉन बनवण्यासाठी हिवाळा हा उत्तम सिझन असतो .15. लॉन बनवताना तण काढून टाकावेत नाहीतर ते खताचं प्रमाण कमी करतं.नर्सरी तज्ज्ञ लीना लोबो यांनी दिलेली माहिती वरच्या व्हिडिओ पाहता येईल.

close