अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीचा भारतावर थेट परिणाम होईल का ?

November 4, 2008 8:09 AM0 commentsViews: 14

बराक ओबामा की जॉन मक्केन.अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक कोण जिंकणार, याबाबतची उत्सुकता जगभरात आहे. ' आजचा सवाल ' मध्ये अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा थेट भारतावर परिणाम होईल का ? या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत आंतरराष्ट्रीय उत्तरा सहस्त्रबुद्धे, आयबीएन-लोकमतच्या फिचर्स एडिटर ज्ञानदा आणि एनआरआय भूषण केळकर सहभागी झाले होते.चर्चेत अमेरिका निवडणुकींच्या मुद्याबद्दल बोलताना म्हणाल्या, निवडणुकीत काही ट्रॅडिशनल मुद्दे असतात. पण यंदा आथिर्क मंदीचा मुद्दा एैरणीवर आहे. बीपीओमुळे अमेरिकेच्या बाहेर जाणार्‍या नोकर्‍या हा मुद्दाही आहे. आथिर्क मंदी हा सत्तेवर असलेल्या रिपब्लिकन पक्षाला अडचणीत आणणारा आहे. इराक आणि अफगणिस्तानचा मुद्दा आहेच. पुण्याहुन चर्चेत सहभागी झालेले भूषण केळकर म्हणाले, मी स्वत:बराक ओबामांना मतदान केलं आहे.ओबामा नक्की जिंकतील.सध्याच्या जागतिक मंदीवर ओबामा आणि मक्केन यांच्यापैकी कोणाकडे उपाय आहे, या आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्या प्रश्नावर ज्ञानदा म्हणाल्या, दोघाही उमेदवारांकडे ठोस उपाय नाही. पण ओबामा ग्रासरूटमधून आल्यानं त्यांच्याकडे काहीतरी मंदीवर उपाय असणार. मॅकेकन कोणतीही टॅक्स कट न करता मार्ग काढला जाईल, असं म्हणतात. चर्चेत निवडणुकीत सहभागी झालेल्या इतर पक्षांचा मुद्दा आला.त्यांच्याकडेही प्रभावी मुद्देअसल्याची माहिती चर्चेत पुढे आली. डेमोक्रेटिक पक्षाला संधी देऊन पाहावं, असं मत अमेरिकेत असल्याचं भूषण केळकर यांनी सांगितलं. निवडणुकीत असलेल्या मीडियाचा प्रभाववरही चर्चा करण्यात आली. ओबामांचा भारताबद्दल बदलत चाललेल्या दृष्टीकोनाबद्दल चर्चा करण्यात आली. निवडणुकीतील 15 टक्के अद्याप अनिश्चित आहे.त्यामुळे काहीही होऊ शकतं',असं सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं. अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीचा भारतावर थेट परिणाम होईल का ? या प्रश्नावर घेण्यात आलेल्या पोलमध्ये 80 टक्के लोकांनी ' हो' उत्तर नोंदवलं.चर्चेचा शेवट करताना निखिल वागळे म्हणाले की, निवडणूक चुरशीची होणार आहे. 48 तासांत महासत्तेचा दावेदार हे कळूनच येईलच.

close