भारतीय राजकारणालाही एखाद्या ओबामाची गरज आहे का ?

November 6, 2008 1:09 PM0 commentsViews: 14

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इतिहास घडला. डेमोकॅट्रिक पक्षाचे उमेदवार सिनेटर बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहे. या निवडणुकीनं अमेरिकेच्या राजकारणात परिवर्तनाची लाट आली आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असणार्‍या भारतात ही या निवडणुकीकडे लक्ष होतं. यानिमित्तानं ' आजचा सवाल ' मध्ये भारतीय राजकारणालाही एखाद्या ओबामाची गरज आहे का ?' , चर्चा करण्यात आली. या चर्चेत कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो, आयबीएन-लोकमतच्या फिचर्स एडिटर ज्ञानदा, भाजपचे नेते शेषाद्री चारी, बसप नेते सुरेश माने सहभागी झाले होते. 'अमेरिकेनं जनतेनं बराक ओबामा हुसैन यांना निवडून दिलं आहे. 66 टक्के मतं त्यांना मिळाली आहेत. हा दिवस जगभरातील पददलितांसाठी ऐतिहासिक असल्याचं स्वत: पंतप्रधानांनी म्हटलं आहे ', असं भालचंद्र कांगो म्हणाले. अमेरिकन निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना ज्ञानदा म्हणाल्या, बुश प्रशासनाला ही चपराक आहे. अमेरिकन जनतेमध्ये बुश प्रशासनाबाबत नाराजी होती. चर्चेत सहभागी झालेले शेषाद्री चारी आणि सुरेश माने यांनीही अमेरिकेत परिवर्तनाची लाट झाली आहे,असं म्हटलं. भारतात ही लाट येऊ शकते का , याबाबतचा मुद्दा चचिर्ला गेला. ' मायावतींना उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकली, तेव्हा सर्वांसाठी हे अनपेक्षित होतं.भारतीय लोकशाहीला मायावतींच्या रुपात लवकरच नवा ओबामा मिळेल ', असं सुरेश माने म्हणाले. यावर भालचंद्र कांगो म्हणाले, मायावती पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. पण मायावतींची आथिर्क आणि परराष्ट्र धोरण कळली पाहिजेत. मायावतींची परराष्ट्र धोरण आणि आथिर्क धोरणांबाबत ठोस भूमिका आहे. पण ती गांर्भीयानं घेतली जात नाही, असं माने म्हणाले. ओबामांना इतिहासाचं भान आहे. विरोधकांना जवळ घेतलं आहे. त्यांचं सर्वसमावेशक धोरण आहे,असं ज्ञानदा म्हणाल्या. अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालानंतर जगाच्या पाठीवरील परिवर्तनवाद्यांसाठी हा सुखाचा क्षण असेल.भारतातील तत्त्वशून्य आणि भष्ट्राचारी नेत्यांना आपण कंटाळलो आहोत. भारतालाही ओबामासारखा नेता हवा, असं पोलद्वारे जनेतनं मत माडलं आहे. तो कधी येणार, याची आपण वाट पाहुया, असं चर्चेचा शेवट करताना आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले.

close