जिद्दीचा प्रवास – पंडित भीमसेन जोशी

November 7, 2008 1:51 PM0 commentsViews: 108

पंडित भीमसेन जोशी यांचा भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. हा पुरस्कारम्हणजे संगीत क्षेत्राचा एकप्रकारे गौरवच. तर संगीत क्षेत्राच्या गौरवावर चर्चेच्या रुपाने ऊहापोह करण्यासाठी आयबीएन लोकमतवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या चर्चेत ज्येष्ठ संगीत समीक्षक, ग्वाल्हेर घराण्याचे गायक अमरेन्द्र धनेश्वर आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायक नीला भागवत यांचा सहभाग होता. पंडित भीमसेन जोशी यांचा एकूण संगीताचा प्रवास जाणून घेताना त्यांचं गाणं, त्यांचं व्यक्तिमत्त्व, भीमसेन म्हणून त्यांनी कसं सांगिताला वाहून घेतलं, भीमसेन म्हणून ते कसे सगळ्यांना भावले या सगळ्याच गोष्टींची चर्चा आजच्या कार्यक्रमात झाली. पंडितजींच्या गाण्याच्या प्रवासाचं वर्णन करताना अमरेन्द्र धनेश्वर म्हणाले, ''एखादा मनुष्य एक काहीतरी आदर्श पाहतो. आणि त्या आदर्शाच्या दिशेने तो एक मोठी झेप टाकतो. तसं पंडितजींच्या बाबतीत झालं आहे. त्यांनी लहानपणी बाजारात कुठेतरी अब्दुल करिम खाँ यांची ध्वनीमुदि्रका ऐकली आणि हे गाणं आपल्याला आलं पाहिजे, हे गाणं आपण गायलं पाहिजे हे त्यांनी मनोमनी ठरवलं. त्या महत्त्वाकांक्षेने त्यांच्या मनाचा असा काही ताबा घेतला की त्यांनी त्या महत्त्वाकांक्षेच्या दिशेने जिद्दीने प्रवास केला.'' पंडीतजींना मिळालेल्या सन्मानाबद्दल नीला भागवत म्हणाल्या, ''पंडित जी आधीपासूनच भारतरत्न आहेत. त्यांनी संगीताच्या निरनिराळ्या प्रकारांचा अशा काही प्रसार केला आहे की त्यांच्या इतकी संगीताची सेवा कुणीही केली नसेल. याचर्चेत पुण्याहून पंडितजींचा मुलगा श्रीनिवास जोशी आणि गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर सहभागी झाले होते. आपले बाबा किती साधे, सरळ आणि कसे उत्तम मार्गदर्शक आहेत हे श्रीनिवास जोशी यांनी सांगितलं. तर पंडितजींच्या गाण्यच्या वैशिष्ट्यांबाबत बोलताना पद्मजा फेणाणी यांनी त्यांचे अभंग कसे आपल्याला भावतात हे सांगितलं.

close