आमची भूमी रंगभूमी

November 7, 2008 1:53 PM0 commentsViews: 82

5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने या रंगभूमीची वैशिष्ट्य, रंगभूमीचं वेगळेपण, रंगभूमीचं स्वरूप , भविष्य हे सगळं ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांनी सांगितलं. शफाअत खान सांगतात, ''जगभर जो काही मराठी माणूस ओळखला जातो, मराठी भाषा ओळखली जाते, मराठी संस्कृती ओळखली जाते ते मराठी नाटकांमुळे. नाटकाचं आणि मराठी माणसाचं नातं अतुट आहे. मराठी नाटकांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात सगळ्या प्रकारची सगळ्या जातीधर्माची माणसं असतात. आपला संघर्ष, आपला प्रवास, आपली झुंज ते या नाटकातून मांडत असतात.'' मराठी नाटकांना सुगीचे दिवस येण्यासाठी निर्मात्यांना प्रयत्न करावे लागतील असं शफाआत खनांनी सांगितलं.

close