गृहमंत्री म्हणून आर.आर.पाटील अपयशी ठरले आहेत का ?

November 7, 2008 5:09 PM0 commentsViews: 15

राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील सध्या टीकेचं लक्ष्य बनले आहेत. राहुल राज प्रकरणात आबांचं ' गोली का जबाब गोली से देंगे ' हे वक्तव्य गाजलं. आबांच्या वक्तव्यामुळे देशभरातून महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलीन झाली.नंतर आबांनी सारवासारव करत ते वक्तव्य गडचिरोलीच्या घटनेशी निगडित होतं, असं सांगितल.या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर 'आजचा सवाल ' मध्ये गृहमंत्री म्हणून आर.आर.पाटील अपयशी ठरले आहेत का ? या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. चर्चेत राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्धिकी, विधानपरिषदेचे आमदार कपिल पाटील, विरोधी पक्षनेते रामदास कदम, पुण्याहून दै.लोकमतचे संपादक अनंत दीक्षित सहभागी झाले होते.चर्चेच्या सुरूवातीलाच विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.आकडेवारी सादर करत आबा अपयशी ठरले असल्याचं सांगितलं.आबांबद्दल बोलताना आमदार कपिल पाटील म्हणाले, आबांनी बेजवाबदार विधानं केली आहेत. त्यांना अतिउत्साहीपणा नडला आहे. राज ठाकरेंनी जे केलं नाही ते आबांनी केलं. ते सुपर राज ठाकरे झाले.सर्वत्र भयाचं आणि सशंयाचं वातावरण निर्माण केलं'. याप्रकरणावर बोलताना नसीम सिद्धिकी यांनी आबांचं समर्थन केलं. दरम्यान, राज ठाकरेंचं आंदोलन सुरू असताना आबांचं गृहखातं काय करत होतं ?,असा सवालही कपिल पाटील यांनी चर्चेत केला. या चर्चेत पुण्याहून सहभागी झालेले दै. लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक अनंत दीक्षित म्हणाले, आबांची प्रतिमा चांगली आहे पण त्यांच्या धोरण आणि व्यवहारावर आधारित टीका होत आहे. काही पोलीस अधिकारी वगळता महाराष्ट्रातील पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. धनंजय रॉय असो नाही तर अ‍ॅनामी रॉय यांची नियुक्ती असो नाही तर खैरलांची प्रकरण सर्वत्र गृहखातं अपयशी ठरलं आहे. आबा सरळ आणि साधे गृहस्थ आहेत पण त्यांची राजकीय कोंडी झाली आली आहे '. चर्चेचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले की आबाचं चारित्र्य जरी चांगलं असलं तरी त्यांची चोहीबाजूने राजकीय कोंडी होत आहे. गृहमंत्री म्हणून आर.आर.पाटील यांनी कामगिरीत सुधारणा केली पाहिजे.

close