मुलींच्या फॅशनची दुनियेत

November 9, 2008 1:23 PM0 commentsViews: 6

युथ ट्यूबच्या या भागात आपण बघितल्या फिमेल अ‍ॅक्सेसरीज. आता मुली म्हटलं की त्या अ‍ॅक्सेसरीजशिवाय कसं रहाणार… आणि आतली गोष्ट म्हणजे अ‍ॅक्सेसरीज वापरण्यापेक्षाही त्यावर ' चर्चा ' करणं आणि ' विंडो शॉपिंग ' हा सगळ्याच मुलींचा लाडका उद्योग. आपण करू ती फॅशन, हे म्हणायला कितीही मस्त वाटलं, तरी चालू फॅशन केली नाही तर काय उपयोग ? म्हणूनच आमची रिपोर्टर मिथीलानं अगदी लेटेस्ट स्टईल आणि फॅशनविषयी या एपिसोडमध्ये भरपूर माहिती दिली. बँगल्स, ब्रेसलेट्स आणि अशाच वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीजमधले लेटेस्ट ट्रेन्ड्स मिथिलानं सांगितले. म्हणजे काय तर आता तुंचा लाडका उद्योग, म्हणजे विंडो शापिंग करायला तुम्हाला वणवण करत भटकायला नको. कारण सोबतच्या व्हिडियोमध्ये तुम्ही विंडो शॉपिंगचा आनंद मनमुराद लुटू शकता.याच एपिसोडमध्ये आपण ओळख करून घेतली नॅशनल स्केटिंग चॅम्पियन ध्वनीतशी. स्केटिंगसारख्या वेगळ्याच विषयात करियर करणार्‍या लहान मुलांचे स्केटिंगचे क्लासेस घेणार्‍या ध्वनीतबरोबर आपण खूप गप्पा मारल्या. ' माझ्या सगळ्या स्टुडंट्सना इंटरनॅशनल लेव्हलचा स्पर्धक बनवायचंय ' असं सांगणार्‍या ध्वनीतच्या आगळ्या वेगळ्या विश्वाची या एपिसोडमध्ये माहिती करून घेतली.

close