‘ फॅशन गुरू ‘ नचिकेत बर्वे

November 9, 2008 2:28 PM0 commentsViews: 6

युथ ट्यूबच्या या भागात आम्ही ओळख करून दिली स्वत:चा मार्ग निवडून त्यावर यशस्वी वाटचाल करणार्‍या फॅशन गुरू नचिकेत बर्वेची. त्याच्या या ' हट के ' करियरविषयी आम्ही त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या. ' फॅशन तो मेरे खून मे है. ' असं नचिकेत म्हणू शकत नाही, कारण त्याच्या कुटुंबातले सगळे डॉक्टर. आणि डॉक्टच्या मुलानं डॉक्टर (च) व्हावं, हा नियम मोडून त्यानं हे वेगळं क्षेत्र निवडलं. आपली आवड ओळखून अहमदाबादच्या एनआयडी इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. तिथून स्कॉलरशिप मिळवून पॅरिसलाही गेला. ' लहानपणापासूनच माझा चॉईस एकदम हट के होती. ' असं सांगत तो म्हणाला, ' मी एक वेळ जुने कपडे वापरले, पण मला आवडले नाहीत, ते कपडे मी कधीच वापरले नाहीत.' आपल्या यशात कुटुंबीयांनी दिलेला सपोर्ट फारच महत्त्वाचा होता, असं तो आवर्जून सांगतो.' जे काही करशील, ते ग्रेट कर असंच त्याच्या आई-वडिलांनी त्याला सांगितलं.फॅशन इंडस्ट्रीविषयी बोलताना तो म्हणाला, ' ही इंडस्ट्री बाहेरून फारच ग्लॅमरस वगैरे वाटते, पण इकडे आल्यावर कळतं की काम खूप आहे, कष्ट अफाट आहेत. ज्या लोकांना आपण इंडस्ट्रीचा चेहरा म्हणून बघतो, त्यांनी 20-25 वर्ष मन मारून काम केलं आहे. तेव्हा ते एवढे सक्सेसफूल झाले. पण नवीन माणसांना इथं खूप काम करावं लागतं. दिवसभरात दोन तासांची झोपही मुश्कील होते.'आपल्या कामाविषयी तो म्हणाला, ' पुढच्या सहा महिन्यातल्या किंवा इन जनरल लोकांच्या भविष्यातल्या आवडी ओळखून तशी डिझाईन्स तयार करणं हे आमचं काम आहे. हे ज्याला ओळखता आलं, तोच यशस्वी फॅशन डिझायनर होऊ शकतो.' फॅशन इंडस्ट्रीतल्या आपल्याला माहित नसलेल्या बर्‍याच गोष्टी नचिकेतनं सांगितल्या. आपल्या लाईफचा मंत्रा तो साध्या शब्दात सांगतो. ' कीप इट सिंपल. 'आणि एवढंच नाही तर हा एपिसोड बघून तुम्ही आपल्या आयुष्यातल्या बर्‍याच गोष्टी मिळवू शकाल. विचारा कसं ? अरे सोप्पं आहे. नोकरी असो वा छोकरी जर चांगले आणि पर्सनॅलिटीला सूट होणारे कपडे हवेतच. आणि तुमच्या पर्सनॅलिटीला काय सूट होतं, काय नाही याच्या छोट्या छोट्या पण महत्तवाच्या टीप्स नचिकेतनं या एपिसोडमध्ये दिल्या आहेत.

close