होमलोन आणि व्याजदर

November 9, 2008 8:06 AM0 commentsViews: 34

होमलोन आणि व्याजदर मार्केटमध्ये पैसा खेळता राहण्यासाठी रिझर्व बँकेनं सीआरआर आणि रेपो रेटमध्ये कपात केली. पाठोपाठ सर्व बँकांनी आपापल्या कर्जावरचे व्याजदर कमी केले. त्यामुळे सध्या होमलोनचे दर कमी झाले आहेत. या कमी झालेल्या व्याजदराचा फायदा नवीन घरखरेदीसाठी कितपत होईल याविषयीची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत होमलोनचे तज्ञ हर्ष रुगंठा .होमलोनचे व्याजदर कमी झाल्यामुळे इएमआय भरणं आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात झालं आहे. हर्ष रुगंठा सांगतात ज्यांना घर खरेदी करायचं आहे त्यांना आता कर्ज घेणं थोडं सोपं जाईल.तसंच फ्लॅटच्या किमतीही सध्या कमी झाल्याअसल्यामुळे स्वत:चं घर खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.घरासाठी कर्ज घेताना प्रथम घराचा विचार करावा. सोयी सुविधांना प्राधान्य द्या. नंतर लोन किती घ्यायचं त्याचा विचार करावा. मुंबईसारख्या भागात वन बीएचकेच्या फ्लॅटची किंमत 15 ते 20 लाखांच्या घरात आहे.त्यामुळे सर्वसामान्य लोकांना थोडीशी कॉस्ट कटींग करावीच लागते. घराचं लोकेशन सगळ्या सोयीसुविधांच्या जितकं जवळ तितकी घराची किंमत जास्त. बँकानी सध्या पाऊण टक्क्यांपर्यंत व्याजदर कमी केले आहेत. यामुळे जर तुम्ही वीस लाखांचं कर्ज वीस वर्षांसाठी घेतलं असेल तर साडे दहा टक्क्यांनुसार तुमचा इएमआय असेल 19968 रुपये. पाऊण टक्के व्याजदर कमी झाल्यानंतर तुमचा इएमआय होईल 18971 रुपये. म्हणजेच तुमचे 997 रुपये कमी होतील आणि एकूण दोन लाख 39 हजार 280 रुपये वाचतील. हर्ष रुगंठा सांगतात, घर घेताना इमारत किती जुनी आहे यावरही काही बँका कर्ज देताना विचार करतात. तसंच तुम्ही कर्जाची रक्कम वेळेवर दिली नाहीतर बँका तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. म्हणून व्याज वेळेवर भरलं पाहिजे. भविष्यात तुमचं इनकम वाढत असेल तर घर घेताना चांगल्या शहराची निवड करा.

close