उपचार वंध्यत्वावरचे

November 11, 2008 1:07 PM0 commentsViews: 62

टॉक टाइम काही दिवसांपूर्वीच्या भागात वंध्यत्वावरच्या उपचारांमध्ये आययुआय पद्धतींबद्दल डॉ.नंदिता पालशेतकर यांनी सांगितलं होतं. आययुआय म्हणजे इन्ट्रा युटेराईन इन्स्युमिनेशन. आययुआयमध्ये वंध्यत्वावरच्या उपचार पद्धतीत स्पर्म नळीच्या सहाय्याने अंडाशयाच्या जवळ नेऊन ठेवला जातो. आणि नंतर त्याचं फलन होतं. आय यु आयचा पुढचा टप्पा हा आयव्हीएफचा असतो. आयव्हीएफ म्हणजे इन व्हायट्रो फर्टीलायझेशन. या उपचारपद्धतीत पुरुषांचे स्पर्मस् आणि स्त्री अंडबीज यांचं प्रयोगशाळेत फलन करतात, मग ते गर्भाशयात ट्रान्सर्फर केले जातात. आयएफआयचे टप्पे आहेत. ते पुढीलप्रमाणे. अंडबीज काढून घेणे त्यांचं कृत्रिमरित्या फलन करणं, त्यातून कृत्रिम भृण निर्मिती करणं आणि त्यानंतर भृण ट्रान्सफर करणं. टॉक टाइमच्या त्यानंतरच्या भागात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर यांनी आयव्हीएफच्या उपचार पद्धतीविषयी सांगितलं. वंध्यत्वावर उपचार शक्य असून ते कमीत कमी खर्चात होतात हेही 'सलाम महाराष्ट्र'मधून सांगितलं.

close