जीव मिल्खा सिंगनं जे टी कप स्पर्धा जिंकली

December 7, 2008 7:41 PM0 commentsViews: 2

7 डिसेंबर टोकियोभारताचा आघाडीचा गोल्फपटू जीव मिल्खा सिंगनं टोकियोत झालेली गोल्फ निप्पोन सीरिज जे टी कप स्पर्धा जिंकली. आणि त्यानं हा विजय हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट असणा-या आपल्या पत्नीला समर्पित केला आहे. जीवची पत्नी कुद्रत टोकियोच्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. सिंगापूरमध्ये शेवटची स्पर्धा जिंकल्यानंतर पहिल्यांदाच जीवनं ही मोठी स्पर्धा जिंकली. 2006मध्ये ही स्पर्धा आपल्या नावावर करणा-या जीवसाठी सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती पण त्यानंतर जीवनं कमबॅक केलं. आणि स्पर्धेवर आपलं नाव कोरलं. या वर्षातलं जीवचं हे दुसरं तर त्याच्या करिअरचं हे चौथं जपान टूर टायटल आहे.

close