बालकलाकार अश्विन चितळे

November 14, 2008 8:09 AM0 commentsViews: 8

'श्वास' फेम बालकलाकार अश्विन चितळे एकदम उत्साही कॅरेक्टर आहे. बालदिनी अश्विनचा गणिताचा पेपर होता. सकाळी मुलाखत आहे म्हटल्यावर अश्विनला सकाळी अभ्यास करायला मिळणार नव्हता. तर पठ्ठा आदल्या दिवशी अभ्यासकरून सकाळी वेळेत पुण्याच्या स्टुडिओत हजर. एकादा का या बालकलाकारांची घौडदौड छोटा पडदा, मोठा पडदा आणि रंगमंचाच्या दिशेने सुरू झाली की त्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नाही. पण अश्विन याला अपवाद असल्याचं दिसून आलं. "गणित माझा आवडता विषय आहे. मी अभ्यासही नेमानं करतो," असं अश्विन म्हणाला. अश्विन पूर्वी आईला सारखा सांगायचा की आई मला टीव्हीत जायचंय. "मला सुरुवातीला असं वाटायचं की टीव्हीत मागून जाता येतं. पण मला 'श्वास'सिनेमा मिळाला तेव्हा टीव्हीवर कसं दिसतात ही प्रोसेस कळली," अश्विन बिनधास्तपणे बोलला. अश्विनला 'श्वास'नंतर 'देवराई', 'टॅक्सी नंबर 9211' हे सिनेमा मिळाले. तो जाहिरातीतूनही झळकला आहे. बालदिनाला गप्पा मारताना अश्विनने त्याचा प्रवास उलगडून दाखवला.

close