सण आला भाग्याचा

November 14, 2008 1:07 PM0 commentsViews: 10

दीपावली निमित्त आयबीएन लोकमत दीपोत्सवातील कार्यक्रमात गाण्याची मैफल साजरी झाली . दीपोत्सवातील या कार्यक्रमात संजीवनी भेलांडे आणि मंदार आपटे यांनी आपल्या सुमधुर स्वरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. संजीवनीनं ज्योती कलश छलके या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. संजीवनीची ओळख म्हणजे ती झी सारेगामा या स्पर्धेची विजेती आणि त्यानंतर चोरी,चोरी दिल ने कहाँ या गाणाने ती सर्वश्रुत झाली. तिने दिनकर कैकीणींकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. तसंच तिने एम.कॉम. केल्यानंतर मास कम्युनिकेशन मधलंही शिक्षण पूर्ण केलंय. तसंच ती चित्रपटातही पार्श्वसंगीत देते. मंदार आपटे सात वर्षे संगीतक्षेत्रात कार्यरत आहे. दूर राहिला गाव, तू असशील तर हे त्यांचे अल्बम प्रसिद्ध आहेत. त्याने गाण्याचं शिक्षण श्रीमती जान्हवी आपटे यांच्याकडून घेतलं आहे.दोघांनी जागो मोहन प्यारे, आनंदाचे डोही,तुला पाहिले नदीच्या किनारी,शुभम् करोती म्हणा,तुझ्या गळा माझ्या गळा ही गाणी म्हटली. दिल है छोटासा या संजीवनीच्या गाण्याला प्रेक्षकांनी दाद दिली. अजि सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू या ज्ञानेश्वरांच्या अभंगानं या दिवाळी मैफिलीची सांगता झाली.

close