राजस्थान, दिल्ली आणि मिझोराम काँग्रेसच्या पारड्यात

December 8, 2008 7:04 AM0 commentsViews: 37

8 डिसेंबरपाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मात्र चांगलीच मुंसडी मारलीय. राजस्थान, दिल्ली आणि मिझोराम या राज्यात काँग्रेसनं सत्तास्थापनेच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला असला तरी गेल्या निवडणुकांच्या तुलनेत या दोन्ही राज्यात काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. मध्यप्रदेशात तर काँग्रेसच्या संख्याबळात दुपटीनं वाढ झालीय. त्यामुळं सत्ता स्थापन करणार्‍या भाजपला तिथं काँग्रेसनं चांगलीच लढत दिल्याचं स्पष्ट होतं.भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये काँग्रेसला मिळालेलं एवढं मोठं यश हे भाजप आणि मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. दिल्लीमधली निवडणूक चुरशीची झाली. त्यात काँग्रेसनं मागच्या निवडणुकीच्या तुलनेत काही जागा गमावल्या असल्या तरीही जनतेनं मुख्यंमंत्री शीला दीक्षित यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. एकूणच पाचही राज्यात काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत निश्चित वाढ झाल्याचं दिसून येतंय. विशेष म्हणजे राजस्थान, छत्तीसगड या राज्यात काँग्रेसचे युवा नेते आणि सरचिटणीस राहुल गांधी यांनी झंझावती प्रचार केला होता. त्याला चांगलंच फळ मिळाल्याचं दिसतंय.

close