उच्चशिक्षण @ UK (भाग 2)

November 15, 2008 12:50 PM0 commentsViews: 29

परदेशात शिक्षणासाठी जाण्याकरता विद्यार्थ्यांची धडपड चालू असते. परदेशी शिक्षणाला पर्याय म्हणजे युके किंवा युएस. त्यातलं युके म्हणजे ब्रिटन आणि युएस म्हणजे अमेरिका. युएसमधल्या शिक्षणाच्या संधी सगळ्यांना ठाऊक आहेत. पण युकेमधल्या फाराशा नाहीत. उच्च शिक्षणासाठी जास्त खर्च करून परदेशी जायला हे विद्यार्थी जास्त उत्सुक असतात, पण हे जाणं कितपत सोपं आहे किंवा याच्यासाठी काय काय मदत लागते, युकेमध्ये शिक्षण घेतल्यावर काय काय संधी उपलब्ध होतात याबाबत 'टेक ऑफ'मध्ये मार्गदर्शन करण्यात आलं. हे मार्गदर्शन युके शिक्षण सल्लागार निशिकांत कोठीकर आणि ब्रिटिश काउन्सिलच्या एज्युकेशन हेड सुचिता गोकर्ण यांनी केलं.युएस आणि युकेमधल्या शौक्षणिक वाटांचा, संधींची तुलना केल्यास युकेमध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत?निशिकांत कोठीकर – युएसमध्ये शिक्षणाच्यादृष्टीने काही गोष्टं खरंच चांगल्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं लग्न झालेलं असेल किंवा तुम्ही स्काऊट टु पार्टनर या संकल्पनेत मोडत असाल तर तुमच्या पार्टनरला डिपेण्डण्डट व्हिसावर नोकरी करता येते किंवा बिझनेस करता येतो.आणि ही बाब खूपच सर्पोटीव्ह आहे. अशी सुविधा तुम्हाला युएसमध्ये नसते. युकेच्या वैद्यकीय सुविधाही खूप चांगल्या आहेत.युकेतमध्ये एनएचएएसची वैद्यकीय मदत असते. ती वैद्यकीय मदत प्रत्येकाला वेळच्यावेळी, गरज पडेल तेव्हा त्याचक्षणी जलद मिळते. तुमच्या मुलांना तिथे शिक्षण मोफत मिळतं. आणि त्या शिक्षणाचा दर्जाही चांगला आहे. या तिनही गोष्टींना युएसमध्ये भरपूर पैसा मोजावा लागतो. युकेमध्ये शिकत असताना शिष्यवृत्ती मिळते का? त्याबद्दलची माहिती ब्रिटीश कौन्सिल देतं का?सुचिता गोकर्ण – युकेमध्ये जाण्यासाठी जर तुम्ही स्कॉलरशीपचा विचार करत असाल तर तो तुम्हाला तिथे जाण्याआधीच करावा लागतो. ब्रिटीश कौन्सिल या शिष्यवृत्तीची सगळी माहिती तुम्हाला देतं. युकेत भरपूर स्कॉलरशीप्स आहेत. या स्कॉलरशीप्सचा नंतर तुम्हाला भरपूर फायदा होतो. कारण त्या स्कॉलरशीपमधल्या निधीचा तुम्हाला भरपूर उपयोग होतो. तिकडे गेल्यावर तुम्हाला कोणीही स्कॉलरशीप देत नाही. कारण तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागतो. म्हणजे स्कॉलरशीपबाबत माहिती आधीच काढवी लागते. ब्रिटीश कौन्सिलची ब्रिटीश शेव्हनिंग स्कॉलरशीप आहे. ही मास्टर्स डिग्रीवाल्या विद्यार्थ्यांना देतो.प्रत्येक स्कॉलरशीपची एक डेड लाईन असते. ब्रिटीश कौन्सिलच्या स्कॉलशीपची डेड लाईन डिसेंबर महिन्यात संपणार. स्कॉलरशीपसाठी तुम्हाला अभ्यासात चांगलं असावं लागतं. या सगळ्या स्कॉलशीप्स तुम्हाला गुणवत्तेवर मिळतात. www.educationuk-in.org या वेबसाईटवर तुम्हाला युके शिक्षणाबाबतची माहिती मिळेल. थोडक्यात पण महत्त्वाचंयुकेतल्या शिक्षणासाठी काही महत्त्वाच्या संस्था : ब्रिटिश कौन्सिलनरिमन पॉइंट,मुंबई- 400 021फोन-022 22823560www.britishcouncil.orgएडव्हाइज ओव्हरसीज एज्युकेशन कन्सल्टन्टधोबी तलाव,मुंबई -400 002फोन-022 4081 3333 / 2200 3338वेबसाईट-www.edwiseinternational.comजीबी एज्युकेशन प्रायव्हेट लि.चर्चगेट, मुंबई, पुणे,अहमदाबाद, कोल्हापुर, भोपाळ, नागपूरफोन- 022 – 2282 6667/8 इ मेल-info@geebeeworld.com mailto:info@geebeeworld.comयुकेतल्या शिक्षणासाठी द्याव्या लागणा-या परीक्षाइंग्लिश भाषेसाठी-IELTS.इंटरनॅशनल इंग्लिश लॅग्वेज टेस्टिंग सिस्टीम.TOEFL-टेस्ट ऑफ इंग्लिश अ‍ॅज फॉरीन लॅग्वेज.मॅनेजमेंटच्या कोर्सेससाठी GMAT द्यावी लागते.अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट,पीएच.डी. कोर्सेस करता येतातसात विद्यापीठांत अप्लाय करण्यासाठी साधारण खर्च 50 हजार रूपयेयात परीक्षा फी,अर्जाची फी,कम्युनिकेशन आणि मेलिंग फी असते युकेमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात सप्टेंबर अखेरीस होतेयुकेमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात सप्टेंबर अखेरीस होतेअंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी UCAS तर्फे अर्ज स्वीकारले जातात. पदव्युत्तर कोर्सेससाठी ऑक्सफर्ड,केंब्रीज,लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यासारख्या संस्थांची प्रवेश परीक्षा असते. महत्त्वाच्या वेबसाईटएज्युकेशन युकेwww.educationuk.orgब्रिटिश कौन्सिलwww.britishcouncil.orgयुके व्हिसा एम्बसीज डिरेक्टरीwww.fco.gov.ukयुकेमध्ये काम करतानाwww.workingintheuk.gov.ukप्रवासासंबंधी माहितीcustoms.hmrc.gov.ukयुकेमध्ये राहण्यासाठी माहितीwww.push.co.uk/livingcostsmap

close