उच्चशिक्षण @ UK (भाग 3)

November 15, 2008 12:49 PM0 commentsViews: 38

परदेशात शिक्षणासाठी जाण्याकरता विद्यार्थ्यांची धडपड चालू असते. परदेशी शिक्षणाला पर्याय म्हणजे युके किंवा युएस. त्यातलं युके म्हणजे ब्रिटन आणि युएस म्हणजे अमेरिका. युएसमधल्या शिक्षणाच्या संधी सगळ्यांना ठाऊक आहेत. पण युकेमधल्या फाराशा नाहीत. उच्च शिक्षणासाठी जास्त खर्च करून परदेशी जायला हे विद्यार्थी जास्त उत्सुक असतात, पण हे जाणं कितपत सोपं आहे किंवा याच्यासाठी काय काय मदत लागते, युकेमध्ये शिक्षण घेतल्यावर काय काय संधी उपलब्ध होतात याबाबत 'टेक ऑफ'मध्ये मार्गदर्शन करण्यात आलं. हे मार्गदर्शन युके शिक्षण सल्लागार निशिकांत कोठीकर आणि ब्रिटिश काउन्सिलच्या एज्युकेशन हेड सुचिता गोकर्ण यांनी केलं.भारतातून इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केल्यावर युकेमध्ये डिग्रीसाठी प्रवेश घेता येतो का? सुचिता गोकर्ण : हो.युकेतली इंजिनिअरिंगची डिग्री ही मान्यताप्राप्त आहे. इकडे डिप्लोमापूर्ण करून युकेत डिग्रीसाठी अ‍ॅडिमशन घेता येतं. इथल्या डिप्लोमाला युकेत स्पेशल क्रेडिटस् मिळतात. आणि तिथे इंजिनिअरिंगच्या दुस-या वर्षाला सहज अ‍ॅडमिशन मिळून जातं. हॉटेलमॅनेजमेंट करून जर युकेत एमबीएसाठी अ‍ॅडमिशन घ्यायचं असेल तर ते घेता येतं का आणि ते किती योग्य आहे?निशिकांत कोठीकर : हो. युकेतलं एमबीए हे जगत्‌मान्य आहे. जर हॉस्पिटॅलिटी करून युकेतून एमबीए केलं तर जॉब अपॉच्युनिटीच्या संधी ही भरपूर आहे. थोडक्यात पण महत्त्वाचंयुकेतल्या शिक्षणासाठी काही महत्त्वाच्या संस्था : ब्रिटिश कौन्सिलनरिमन पॉइंट,मुंबई- 400 021फोन-022 22823560www.britishcouncil.orgएडव्हाइज ओव्हरसीज एज्युकेशन कन्सल्टन्टधोबी तलाव,मुंबई -400 002फोन-022 4081 3333 / 2200 3338वेबसाईट-www.edwiseinternational.comजीबी एज्युकेशन प्रायव्हेट लि.चर्चगेट, मुंबई, पुणे,अहमदाबाद, कोल्हापुर, भोपाळ, नागपूरफोन- 022 ज्ञ् 2282 6667/8 इ मेल-info@geebeeworld.com mailto:info@geebeeworld.comयुकेतल्या शिक्षणासाठी द्याव्या लागणा-या परीक्षा

इंग्लिश भाषेसाठी-IELTS.इंटरनॅशनल इंग्लिश लॅग्वेज टेस्टिंग सिस्टीम.TOEFL-टेस्ट ऑफ इंग्लिश अ‍ॅज फॉरीन लॅग्वेज.मॅनेजमेंटच्या कोर्सेससाठी GMAT द्यावी लागते.

अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट,पीएच.डी. कोर्सेस करता येतात

सात विद्यापीठांत अप्लाय करण्यासाठी साधारण खर्च 50 हजार रूपयेयात परीक्षा फी,अर्जाची फी,कम्युनिकेशन आणि मेलिंग फी असते .युकेमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात सप्टेंबर अखेरीस होते .युकेमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात सप्टेंबर अखेरीस होते .अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी UCAS तर्फे अर्ज स्वीकारले जातात. पदव्युत्तर कोर्सेससाठी ऑक्सफर्ड,केंब्रीज,लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यासारख्या संस्थांची प्रवेश परीक्षा असते.

महत्त्वाच्या वेबसाईट :

एज्युकेशन युके

www.educationuk.org

ब्रिटिश कौन्सिलwww.britishcouncil.orgयुके व्हिसा एम्बसीज डिरेक्टरी :

www.fco.gov.ukयुकेमध्ये काम करताना :

www.workingintheuk.gov.ukप्रवासासंबंधी माहिती :

customs.hmrc.gov.ukयुकेमध्ये राहण्यासाठी

www.push.co.uk/livingcostsmap

close