मुख्यमंत्र्यांसह नव्या मंत्रिमंडळांचा शपथविधी पार

December 8, 2008 1:25 PM0 commentsViews: 3

8 डिसेंबर, मुंबई राजभवनाच्या ' दरबार ' हॉलमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह नव्या मंत्रिमंडळांचा शपथविधी सोहळा संध्याकाळी पार पडला. राज्यपाल एस.सी.जमीर यांनी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाची आणि छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांच्यासह 26 कॅबिनेट आणि 13 राज्यमंत्र्यांनी ही आज शपथ घेतली. काँग्रेसच्यावतीनं नितीन राऊत, सुरुपसिंग नाईक, शोभा बच्छाव आणि नसीम खान यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे तर बाबा सिद्दिकी आणि सतीश चतुर्वेदी यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते -पाटील, अजित पवार, जयंत पाटील, गणेश नाईक, दिलीप वळसे – पाटील, मनोहर नाईक, डॉ. विमल मुंदडा, विजय गावित, रामराजे निंबाळकर, बबन पाचपुते, नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, विनय कोरे, राजेश टोपे, रमेश बंग यांची नावं कॅबिनेटमंत्री तर राज्यमंत्रीपदी जयप्रकाश दांडेगावकर, हसन मुश्रीफ, राणा जगजितसिंग, सतीश पाटील, प्रीतम शेगावंकर आणि नाना पाचबुद्धे यांची निवड करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यांना बढती देण्यात आली असून अनिल देशमुख यांना वगळण्यात आलं आहे.

close