मुंबईमध्ये यंग शांतीदूत

November 16, 2008 7:22 AM0 commentsViews: 5

युथ ट्यूबच्या या भागात आमची रिपोर्टर प्रियांका पोहचली वर्ल्ड फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्सन असोसिएशननं आयोजित केलेल्या ग्लोबल मिलेनियम डेव्हलपमेंट गोल समीटमध्ये. या समीटमध्ये जगभरातल्या साधारण 300 मुला-मुलींनी भाग घेतला. वेगवेगळ्या भाषा असल्या तरी संवाद साधायला त्यांना ही अडचण कधीच आली नाही. आमची रिपोर्टर प्रियांकांने या देशोदेशीच्या मुलांबरोबर भरपूर धमाल केली. वेगवेगळ्या भाषातली गाणी, डायलॉग आपण प्रेक्षकांना दाखवले. आणि हो आमची रिपोर्टर प्रियांकानं या जगभराच्या मुलांना मराठी बोलायलाही शिकवलं. या समीटचा संयोजक जयहिंद कॉलेजमध्ये शिकणार्‍या सौम्यकची माहितीही आपण युथ ट्यूबच्या या भागात दिली. तसंच देशभरातले तरुण, त्यांच्या समस्या, चांगले उपक्रम, दहशतवाद अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण जगभरातल्या तरुणांशी संवाद साधला, आणि जगातले सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो, फक्त गरज आहे ते एकत्र येऊन काम करण्याची, असंच मत सगळ्यांनी मांडलं. एकूण काय जगभरातली सगळी तरुण मुलं काहीतरी चांगलं करायला बघतायत, पण त्यासाठी असा एखादा प्लॅटफॉर्म मात्र त्यांना उपलब्ध करून द्यायला हवा. जगभरातल्या या मुलांबरोबर केलेली मजा आणि त्यांचे विचार पहाण्यासाठी तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करू शकतो.

close