मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपची आगेकूच

December 8, 2008 11:15 AM0 commentsViews: 2

8 डिसेंबर, भोपाळ / रांची मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बाजी मारली आहे. छत्तीसगडमध्ये सुरुवातीच्या मतमोजणीच्या निकालात काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढाई दिसून आली पण भाजपनं पुन्हा आघाडी घेत बाजी मारली. छत्तीसगडमध्ये रमन सिंग हे दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गावर आहेत.तिकडे मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. सरकारविरोधी मताचा भाजपला फटका सहन करावं लागेल, असं बोललं जात होतं पण जनतेनं भाजपच्या बाजूनंच कौल दिला.

close