मुलं परदेशात असताना… (भाग 1)

November 17, 2008 12:19 PM0 commentsViews: 11

"माझी मुलगी 13-14 वर्षांपर्वी युएसला गेली होती. तिचे तिथे जाण्याआधीचे दिवस मला अजूनही आठवत आहेत. आमच्या घरी इतकी धांदल होती की दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा हेही कळायचं नाही. तिच्या कपड्यांची खरेदी, तिच्या सामानाची बांधाबांधा, बरीक बारीक गोष्टींच्या टीप्स असं सगळं करण्यातच माझा दिवस जायचा. पण ती जेव्हा तिथे रहायला गेली तेव्हा माझ्या आयुष्यात तिचं काय स्थान होतं हे कळून चुकलं. ती माझी चांगली मैत्रिण होती. आम्ही दोघी खूप गोष्टी एकमेकींशी शेअर कारायचो. पण आता तसं काहीच होत नव्हतं. सप्टेंबर 2004 मध्ये टीना अम्बानीची हार्मनी फाऊण्डेशनमध्ये जायला लागले आणि माझा एकाकीपणा गेला," माधुरी झव्हेरी 'टॉक टाइम'च्या 'मुलं परदेशी असताना…'च्या चर्चेत सांगत होत्या. मुलं परदेशी गेल्यावर पालकांना वाटणारा एकाकीपणा कसा घालवला पाहिजे, पालकांनी काय केलं पाहिजे याविषयावर 'टॉक टाइम'मध्ये मार्गदर्शन करण्यात आलं. वर सांगितल्याप्रमाणे माधुरी झव्हेरींनी स्वत:चा एकटेपणा घालवण्यासाठी टीना अम्बानींची 'हार्मनी ' फाऊण्डेशन ही संस्था जॉइण्ट केली. हार्मनी फाऊण्डेशनही ज्येष्ठ नागरिकांसाठीची संघटना असून तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी काय काय उपक्रम राबवले जातात याची माहिती . तसंच 'मुलं परदेशी असल्यावर' पालकांनी इथे स्वत:चा वेळ कसा घालवला पाहिजे यावर मार्गदर्शन केलं. ते वरच्या व्हिडिओवर पाहता येईल.

close