एपिलेप्सीशी लढताना… (भाग – 2)

November 18, 2008 11:46 AM0 commentsViews: 14

एपिलप्सी म्हणजे काय तर आकडी. मेंदूबाबतचा पहिला आजार म्हणून एपिलेप्सीकडे पाहिलं जातं. या एपिलेप्सीची लक्षणं कोणती, एपिलेप्सी झाल्यावर काय काळजी घेतली पाहिजे, यावर बोलण्यासाठी 'टॉक टाइम'मध्ये केईएमचे कन्स्लटींग न्युरोलॉजिस्ट डॉ. योगेश घोडके आणि एपिलेप्सी झालेल्या रुग्णांना स्वमदत गटातून मदत करणार्‍या यशोदा वाकणकर यांना बोलावलं होतं. त्यांनी प्रेक्षकांना आकडीबाबत मार्गदर्शन केलं.एपिलेप्सीबाबत डॉ. योगेश घोडके सांगतात – "एपिलप्सी म्हणजे काय तर आकडी. हा मेंदूशी संबंधित आजार आहे. हा आजार कोणत्याही वयोगटातल्या माणसाला होतो. जेव्हा जेव्हा म्हणून कुणाला आकडी येते तेव्हा त्या रुग्णाच्या समोर गर्दी करायची नाही. आकडी येताना दाताखाली जीभ चावली जाण्याची शक्यता सर्वात जास्त असते. अशावेळी रुग्णाच्या दाताच्या मध्ये रुमाल ठेवायचा. कांदा किंवा कोल्हापुरी चप्पल हुंगवल्यास आकडीचा प्रभाव कमी होतो, असं म्हणतात. प्रत्यक्षात तसं नाही. आकडी जशी येते तशी ती आपसुकच जाते. त्यावेळी हुंगवलेला कांदा आणि कोल्हापुरी चप्पल हे निमित्त मात्र ठरतात. आकडीतून बाहेर आल्यावर रुग्ण 5 ते 10 मिनिटं जागा वाटत असला तरी तो नीटसा शुद्धीवर नसतो. अशावेळी रुग्णाला पेलाभर पाणी प्यायला द्यायचं. आकडीचे येण्याची लक्षणंही वेगवेगळी आहेत. लहानमुलं डोळे मिचकावतात. काही आपल्या ओठांवरून जीभ फिरवतात. काहींना डोळ्यापुढे अंधारी येतेय असं वाटतं तर काहीच्या पोटात किंवा काळजात धस्स होतं. आकडीचा आजार असणा-यांनी न्युरोसर्जन्सचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानंच औषधोपचार करायचे." एपिलेप्सी झालेल्या रुग्णांना स्वमदत गटातून मदत करणार्‍या यशोदा वाकणकर सांगतात, " ज्यांना ज्यांना कुणाला आकडीचा आजार असतो त्यांना, मुलांच्या घरच्यांना स्वत:विषयी कॉप्लेक्स वाटतो. त्यांच्यातला कॉम्प्लेक्स कमी करतो. औषधांसाठी खर्च करणं हेही त्यांना परवडण्यासारखं नसतं. अशांना आम्ही मदत करतो.'' डॉ. योगेश घोडके आणि स्वमदत गटाच्या यशोदा वाकणकर यांनी एपिलेप्सीबाबत सांगितलेली माहिती तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईल.एपिलेप्सीचा अ‍ॅटॅक आल्यावर आजुबाजूच्यांनी घेण्याची काळजी – शांत रहावं.रुग्णाला जागेवरून हलवू नका.रुग्णाला धक्का देऊ नका.अणकुचीदार वस्तू रुग्णापासून लांब ठेवा.रुग्णाला हळूवारपणे कुशीवर झोपवा.डोक्याखाली उशी ठेवा.5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फिट आली तर डॉक्टरांना बोलवा.रुग्णाला झोपायला द्या.कोणत्या गोष्टी टाळाव्यातविमान प्रवास.गाडी चालवणं.गिर्यारोहण.

close