कोलकाताच्या ‘ ऋत्विक नाट्य महोत्सवा ‘त मराठी नाटक

December 8, 2008 11:54 AM0 commentsViews: 5

8 डिसेंबर, मुंबई कोलकाताच्या ऋत्विक नाट्य महोत्सवात पहिल्यांदाच ' आदिपश्य ' या मराठी नाटकाला मान मिळाला आहे. 11 ते 21 डिसेंबर या दरम्यान होणार्‍या या फेस्टिव्हलमध्ये 20 आणि 21 डिसेंबर रोजी ' आदिपश्य 'चा प्रयोग होणार आहे. ऋत्विक नाट्य महोत्सवात परदेशी आणि भारतीय नाटकं पाहायला मिळतात. ' एडिपेक्स रेस्क ' या ग्रीक शोकांतिकेचं 'आदिपश्य ' हे नाटक कीर्तनाच्या स्वरुपात आहे. एका राजाच्या कथेवर आधारलेलं हे नाटक , आतापर्यंत 150 भाषांमध्ये रूपांतरित झालंय. त्याचं दिग्दर्शन, मुख्य भूमिका निखिल हजारेंची आहे. या नाटकात एकूण 25 कलाकार आहेत. हे नाटक महोत्सवापर्यंत जाण्यासाठी सांस्कृतिक संचालनालयानं मदत केली आहे.

close