26/11 च्या मास्टरमाईंडला पाकिस्तानात अटक

December 8, 2008 12:03 PM0 commentsViews: 4

8 डिसेंबर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर ए तोयबाचा कमांडर झकीर-उर- लखवीला पाकिस्तान सरकारनं अटक केल्याची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडून पाकनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. आझाद जम्मू आणि काश्मीर तसचं देशातल्या वेगवेगळ्या भागात लष्कर ए तोयबा विरुद्ध सरकारनं कारवाई सुरु केलीय, असं डॉन या वृत्तपत्रानं म्हटलंय. मुजफ्फराबाद मध्ये रविवारी रात्री जमात उद दवा या संघटनेविरुद्ध कारवाई करण्यात आली ज्याचा प्रमुख हफिज मोहम्मद सईद हा आहे. या संघटनेवर बंदी घालण्यात आलीय. या संघटनेचं नवं रुप लष्कर ए तोयबा असल्याचं म्हंटल जातं. या कारवाईतच 20 लोकांसोबत झकीर-उर- रेहमान लखवीला अटक करण्यात आली. वॉशिंग्टन पोस्टनं ही बातमी दिली होती की अमेरिकेनं पाकिस्तानला लखवीला अटक करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. लष्कर ए तोयबाविरुद्ध केलेल्या या कारवाईमुळे भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमी होण्यास मदत होईल अशी आशा डॉन या वृत्तपत्रानं व्यक्त केलीय.

close