मुलांचे हक्क (भाग-3)

November 20, 2008 9:44 AM0 commentsViews: 8

मुलांच्या हक्कांवर चर्चा करण्यासाठी ' टॉक टाइम 'मध्ये प्रेरणा संस्थेचे प्रवीण पाटकर आले होते. ते बालकांचे हक्क, बालकांचं शोषण, बालक हक्क जागृतीबद्दल बोलले. प्रवीण पाटकर सांगतात, "मुलांचे चार अधिकार आहेत आणि ते म्हणजे जगण्याचा, विकासाचा, संरक्षणाचा आणि सहभागाचा. जगण्याच्या अधिकारामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा हे तीन घटक येतात. विकासाच्या हक्कामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांवर जे अत्याचार होतात, त्यांचं शोषण होतं, त्या विरूद्ध संरक्षणाचा अधिकार आहे. तर सहभागाचा हा मुलांना फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन म्हणजे मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं सांगतो. मुलांवर अत्याचार होत असतील आणि त्यांना स्वत:चं संरक्षण करायचं असेल तर त्यांनी छोट्यांसाठी 1098 ही हेल्पलाईन दिली आहे. प्रवीण पाटकर यांनी मुलांच्या हक्कांवर केलेली चर्चा व्हिडिओवर पहा

close