ओळख शीला दीक्षितांची….

December 8, 2008 12:10 PM0 commentsViews: 4

शीला दीक्षित1998 पासून दिल्लीच्या मुख्यमंत्री असलेल्या शीला दीक्षितांनी अखेर राजधानीत काँग्रेसची सत्ता राखलीय. गोल मार्केट मतदार संघातून त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे विजय जोली यांच्यावर विजय मिळवला. दिल्लीचं मुख्यमंत्रीपद दोनदा भूषवणा-या शीला दीक्षितांची राजकीय कारकिर्द सुरू झाली ती 70च्या दशकात. त्या सुरुवातीला काँग्रेस युवा महिला संघटनेच्या अध्यक्ष झाल्या. दिल्ली युनिव्हर्सिटीतून एमए झालेल्या शीला दीक्षित दिल्लीत येण्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या कनौजच्या खासदार होत्या. महिलांच्या अधिकारासाठी काम करणा-या युनोच्या कमिटीवर त्यांनी पाच वर्षे भारताचं प्रतिनिधीत्व केलं. 1986 ते 1989 या कालावधीत त्यांनी केंद्रसरकारमध्ये पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र व्यवहार खातं सांभाळलं. त्या दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षही होत्या. दिल्लीचं दोनदा मुख्यमंत्रीपद भूषवणा-या शीला दीक्षित यांच्याच गळ्यात तिस-यांदा मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे.

close