प्रिन्स ऑफ कोलकाता भाग 1

November 21, 2008 9:15 PM0 commentsViews: 5

प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुली म्हणजे प्रिन्स ऑफ बंगाल. ऑफ साइटचा राजा.भारतीय क्रिकेटचा यशस्वी कप्तान.अशी अनेक बिरूद सौरवला अगदी योग्य वाटतात. क्रिकेट जगतात त्याने अनेक चढ उतार पाहिले. आणि ते लीलया पचवले देखील. सौरवच्या निवृत्तीमुळे मधल्या फळीचा एक आधार स्तंभ जाणार हे निश्चित. टेस्ट क्रिकेट प्रमाणे त्याचं वन डे करिअरही सॉलीड असं होतंच. त्याच्या कप्तानगिरीखाली भारताने अनेक विजय मिळवलेच त्याहूनही नवं नवे विक्रम केले.सौरवच्या करिअरचा एकूण लेखाजोखा आम्ही आयबीएन लोकमतच्या स्पेशल शोच्या माध्यमातून मांडला.लहानपणी क्रिकेट नव्हे तर फुटबॉल ज्याचा आवडीचा खेळ होता . तो क्रिकेटमध्ये इतका यशस्वी होईल असं अनेकांना आजही खरं वाटत नाही. सौरवचे वडील बंगाल क्रिकेटमध्ये सक्रिय होतेच शिवाय त्याचा मोठा भाऊही उत्तम क्रिकेट खेळायचा. हट्टापायी हाती घेतलेली बॅट हळूहळू धावा जमवू लागली आणि स्वत:चा क्लव, रणजी आणि नंतर इंडियन टीम असा त्याचा प्रवास झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन सौरभ ही जोडी यशस्वीच ठरली नाही तर त्यांनी जिंकण्याची चांगली सुरुवात दिली. एक यशस्वी कप्तान म्हणून सौरभने भारतीय इतिहासात आपलं नावं अगदी पक्कं केलंय.

close