इंग्लडचा भारत दौरा निश्चित

December 8, 2008 12:55 PM0 commentsViews: 3

8 डिसेंबर इंग्लडचा भारत दौरा निश्चित झाला असून येत्या 11 तारखेपासून भारत आणि इंग्लंडदरम्यान पहिल्या टेस्टला सुरुवात होत आहे. या दौ-यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सुरक्षा अधिका-यानं भारतातल्या सुरक्षेव्यवस्थेचा आढावा घेऊन तो अहवाल ईसीबीला सादर केला. इंग्लंडचे सुरक्षा सल्लागार रेग डिकासन यांनी पहिल्या टेस्टसाठी चेन्नईला आधीच हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार इंग्लंडची टीम दोन बॅचमध्ये चेन्नईला रवाना होईल. मोहालीत टेस्ट खेळवण्याबाबत अजून निर्णय व्हायचा आहे. मोहालीच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी मंगळवारी होणार असून यानंतरच इथं टेस्ट खेळवायची की नाही याबाबत निर्णय होणार आहे.

close