इकॉनॉमिक्समधलं करियर – भाग 2

November 23, 2008 12:04 PM0 commentsViews: 1

इकॉनॉमिक्स आपण दररोज जगतो. किंबहुना आपल्याला ते जगावच लागतं. असं सांगत प्रा. वर्षा माळवदे म्हणाल्या म्हणाला 'मला इकॉनॉमिक्सनं आजूबाजूच्या घटनांकडे बघण्याची एक दृष्टी दिली. जगण्याचं आणि रिसोर्सेस योग्य प्रकारे वापरायचं एक भान दिलं. आणि जगभर रिसोर्सेसचा एवढा र्‍हास चालू आहे की हा विचार रुजणं गरजेचं आहे.'परदेशातून एमबीए इन फायनान्सची डिग्री घतल्यानंतर भारतात बराच स्कोप आहे, असं एका प्रश्नाचं उत्तर देताना प्रा. वर्षा माळवदे यांनी सांगितलं. 'इंग्लंडमधल्या बर्‍याच कंपन्या सध्या भारतात येत आहेत. भारत आणि चीनला तुलनेनं मंदीचा फटका कमी बसलाय. त्यामुळे इंग्लंडमधून डिग्री घेतली तर भारतात उत्तम करियर होऊ शकतं. फक्त इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना युनिव्हरसिटी काळजीपूर्वक निवडावी' असंही त्यांनी सांगितलं.जर सजगपणे इकॉनॉमिक्समध्ये करियर करायचं असेल तर वाचन अतिशय महत्त्वाचं आहे. 'इकॉनॉमिक्समध्ये करियर करताना इकॉनॉमिक्सचं फंडामेंटल पुस्तक म्हणजे सॅम्युअलसनचं बेसिक प्राईज थिअरी हे पुस्तक वाचलच पाहिजे. याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेविषयी डॉ. धनंजय गाडगीळ, वि. म. दांडेकर,आर व्ही राव, सुखमय चक्रवर्ती यांची पुस्तकं वाचणं आवश्यक आहे. कारण अभ्यासक्रमातून त्यांना इकॉनॉमिक्सची बेसिक प्रिन्सिपल्स कळतील. पण भारतीय अर्थव्यवस्थेतलं त्याचं अ‍ॅप्लिकेशन ही पुस्तकं वापरून कळू शकेल.' असं प्रा. अभय टिळक यांनी सांगितलं.फायनान्शिअल जर्नलिझममध्ये करियर करायचं असेल तर इकॉनॉमिक्सची बेसिक प्रिन्सिपल्स पक्की हवीत असं सांगत प्रा. वर्षा माळवदे म्हणाल्या 'शिक्षण सुरू असतानाच विश्लेषणात्मक लेखनाला सुरुवात केली पाहिजे. भारतीय अर्थशास्त्रज्ञांचीही पुस्तकं वाचायला हवीत आणि तसंच महादेव गोविंद रानडे, नामदार गोखले यांच्यासारखे समाजसुधारक इकॉनॉमिस्टही होते, याचं भान ठेऊन त्यांचीही पुस्तकं वाचायला हवीत.'इकॉनॉमिक्समधल्या करियरसंदर्भातली ही चर्चा आपण सोबतच्या व्हिडियोवर पाहू शकता.

close