ग्राफिक नॉव्हेल्सची अनोखी दुनिया

November 22, 2008 3:25 PM0 commentsViews: 11

युथ ट्युबच्या या भागात आपण भेटलो ग्राफिक नॉव्हेलिस्ट तेजस मोडक आणि चेतन जोशीला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ग्राफिक नॉव्हेल म्हणजे काय ? म्हणजे दोन्ही शब्द तर ओळखीचे वाटतायत, पण नेमकं काय ते अजूनही कळत नाही. तर ग्राफिक नॉव्हेल म्हणजे एका वेगळ्या प्रकारची कॉमिक्स बुक्स. शब्द आणि चित्र एकत्र आली की ग्राफिक नॉव्हेल तयार होतं. 1980-1990 च्या सुमारास या प्रकाराला सुरुवात झाली. 'मुलांना वाचायला आवडत नाही, अशी ओरड होताना दिसते. पण जर त्यांना सिनेमाप्रमाणेच शब्द आणि चित्र एकत्र मिळाली तर त्यांना ते नक्कीच आवडेल' असं तेजसनं सांगितलं. अमर चित्रकथा सोडलं तर या प्रकारचा प्रयत्न भारतात याआधी झालेला नाही. पण आता ग्राफिक नॉव्हेलमुळे ओरिजनल क्रिएशनही वाचायला मिळेल. ग्राफिक नॉव्हेलच्या या अनोख्या दुनियेची सफर पहाण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लीक करा.

close