पॅकेजच्या घोषणेमुळे गाड्यांच्या किमती होणार कमी

December 8, 2008 1:39 PM0 commentsViews: 4

8 डिसेंबर, मुंबईकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 हजार कोटींच्या मिनी बजेटमध्ये ' आम आदमी ' ला यात काय मिळणार आहे, कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत. या पॅकेजच्या घोषणेनंतर सर्व ऑटो मोबाईल कंपन्यांनी गाड्यांच्या किमती कमी करण्याचं ठरवलंय. त्यानुसार मारूती आणि टाटा मोटर्स कंपनी गाड्यांच्या किंमती चार टक्क्यांनी कमी करणार आहेत. त्यामुळे गाड्यांच्या किमती पाच हजार ते एक लाखांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. मारूती ऑल्टो 8 हजारांनी स्वस्त होऊन 2 लाख 12 हजार रूपयांत उपलब्ध होईल. इंडिका 13 हजार रूपयांनी स्वस्त होईल आणि ती 3 लाख 28 हजारांत मिळेल. महिंद्रा लोगान साडे अठरा हजारांनी स्वस्त होऊन 4 लाख 44 हजार 500 रूपयांत मार्केटमध्ये उपलब्ध होईल. 5 ते 20 लाखांपर्यंत होम लोन घेणार्‍यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलीये. सरकारी क्षेत्रातल्या बँका यासंदर्भात नवे सुधारित व्याजदर लवकरच जाहीर करतील. त्याशिवाय पॅकेजमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही घट होणार आहे. त्यात चहा पावडर, डाळी, खाद्यतेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतींचा समावेश आहे. या सर्व उपाययोजनांमुळे 'आम आदमी ' च्या बजेटवरचा ताण कितपत कमी होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

close