स्वच्छ, संदर नखं (भाग – 3)

November 24, 2008 9:24 AM0 commentsViews: 199

आपण त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घेतो. मात्र निर्जीव असणा-या नखांकडे आपलं कळत नकळत दुर्लक्ष होतं. जर नखांना चमकवलं, त्यांना सजवलं तर ती व्यवस्थित, नीटनेटकी स्वच्छ दिसतात आणि आपल्या सौंदर्यात विशेष भर पडते ती वेगळी. नखांची विशेष काळजी घ्यायची कशी नखतज्ज्ञ अश्विनी हळदणकर यांनी 'टॉक टाइम'मध्ये मार्गदर्शन केलं. नखांवरून व्यक्तीचं आरोग्य कळतं हा सर्वांना ठाऊक असणारा मुद्दा त्यांनी मुलाखतीत सर्वप्रथम मांडला आणि या मुद्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. नखतज्ज्ञ अश्विनी हळदणकर सांगतात – "जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीला पाहतो, तेव्हा आपलं सर्वात आधी लक्ष केस, चेहरा आणि नखांकडे जातं. त्यामुळे जशी आपण केस आणि त्वचा यांची काळजी घेतो, तशी नखांचीही काळजी घेतली पाहिजे. नखांवरून आपलं आरोग्य कळतं. नखांवरून व्यक्तीच्या व्यक्त्मित्त्वाची ओळख एका क्षणात होते, त्यामुळे नखांची काळजी घेणं आवश्यक आहे. रोजच्या नखांच्या काळजीबाबत अश्विनी हळदणकर सांगतात – बाजारात हातापायांची नखं स्वच्छ करण्याचा ब्रश मिळतो. रोज आंघोळ करताना पायांची नखं स्वच्छ करण्याच्या ब्रशने पायांची नखं घासून स्वच्छ करायची. त्याब्रशच्या मागच्या बाजूला खडबडीत भाग असतो. त्याने पायांच्या टाचा घासायच्या. हातांची नखं ही अशाच पद्धतीने स्वच्छ करायची. आंघोळीनंतर आपण जसं अंगाला मॉईश्चरायझिंग क्रीम लावतो, तसं क्रीम हातापायांच्या नखांना लावायचं. हिवाळ्याच्या दिवसांत आपली नखं सर्वात जास्त कोरडी होतात. अशावेळी नखांना रोज रात्री तेल लावायवचं. त्याने नखं मऊ होतात. बदामाचं तेल, तिळाचं तेल, खोबरेल तेल, एरंड तेल यापैकी कोणत्याही एका तेलाने नखांना, हाताच्या बोटांना, हाताला मसाज करायचा. नंतर हाता-पायांत सुती हातमोजे घालायचे. दुस-यादिवशी आपले हात-पाय मऊ होतात. अश्विनी हळदणकर यांनी 'टॉक टाइम'मध्ये केलेलं मार्गदर्शन तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईलनखांची काळजी

नेल पॉलिश 2 ते 3 दिवसांनी काढून टाकावं, म्हणजे नखांना ऑक्सिजन मिळतो.नखांना झळाळी आणण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा.लिंबाचा रस लावल्यास नखांना शाईन येते.नख स्वच्छ करण्यासाठी हायड्रोजन पॅरॉक्साईड कापसात भिजवून नखांना लावावं.मॅनिक्युअर करण्यापूर्वी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून नखांवर चोळावा.कापलेल्या लिंबात नखं घालून फिरवली तर नखांच्या आतला भाग स्वच्छ होतो.साबणाने हात धुतल्यावर हॅन्ड लोशन लावावे अर्धा लिंबू रस आणि पाणी यात नखं बुडवून ठेवली तर नखांचं पिवळेपण जातेटॉप कोटमुळे नेल पॉलिश टिकते.रोज खोबरेल तेलाचा मसाज नखांना आणि हातांना करावा.

नख वाढवण्यासाठी

नख खाऊ नकायोग्य आहार घ्यासाबणाच्या पाण्यात हात घालू नकाहॅन्ड लोशनचा वापर कराअल्मन्ड ऑईल आणि सॉल्ट यांनी मसाज केला तर नखं मजबूत होतात

संपर्क – अश्विनी हळदणकर : 9969450240 / 9320677736

close