भाजपाचा हसरा चेहरा डॉ. रमणसिंग

December 8, 2008 12:48 PM0 commentsViews: 8

भाजपला छत्तीसगडमध्ये बळ देणारे भाजपचे पहिले मुख्यमंत्री रमणसिंग यांनी यावेळीही भाजपला यश मिळवून दिलं. यांच्या कारकीर्दीवर एक नजर …भाजपाचा हसरा चेहरा म्हणून ओळख असलेले मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग.भाजपाचे पहिले मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग यांनी 5 वर्षात आपले स्थान चांगलेच मजबूत केले. 15 ऑक्टोबर 1952 ला जन्मलेले रमणसिंग हे भाजपाचे डार्क हॉर्स ठरले. 2003 च्या विधानसभा निवडणुकांत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला घवघवीत यश मिळाले.इंडिया टुडेनी त्यांना 2005 मध्ये नंबर वन मुख्यमंत्री ठरविले.मनुष्य बळ विकासासाठी युनोनं छत्तीसगड राज्याला सर्वोच्च पुरस्कार दिला होता.2005 मध्ये त्यांनी छत्तीसगड मधल्या नक्षलवादी संघटनांवर बंदी घातली.भाजपाचे सर्वमान्य नेते म्हणून त्यांनी आपला जम बसवला.काँग्रेसमधल्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांचे स्थान अधिकच मजबूत झाले.3 रुपये तांदळाची घोषणा केल्यामुळे गरीब जनता डॉ. रमणसिंह सरकारवर खूष होती. रमणसिंगांचा करीश्मा सध्या राज्याच्या राजकारणात मोठा आहे.

close