महानदीच्या तीरावर… आदिवासींवरचा सिनेमा (भाग – 1)

November 24, 2008 3:39 PM0 commentsViews: 4

उत्तम साहित्यावरचे सिनेमे बनवणं हे खरं तर आव्हानच असतं. कारण इथे निर्माता-दिग्दर्शकाचं सगळं कौशल्य पणाला लागतं. असचं आव्हान निर्माता-दिग्दर्शक प्रभाकर निकळंकर यांनी पेललं आहे. दुर्गा भागवंतांच्या ' महानदीच्या तीरावर ' या कादंबरीवर ते सिनेमा काढत आहे. सिनेमाचं नाव 'महानदीच्या तीरावर' आहे. आदिवासी जीवनावर या सिनेमा पूर्णपणे बतलेला आहे. त्यांची कला, संस्कृती आणि साहित्याला सिनेमात स्थान तर दिलेलंच आहे. पण त्याचबरोबरीने सिनेमात त्यांचा संघर्षही मांडलेला आहे. या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व कलाकार नवे आहेत. निर्माता-दिग्दर्शक प्रभाकर निकळंकर यांनी ' महानदीच्या तीरावर ' या सिनेमाचे अनुभव या व्हिडिओवर पहा.

close