अतिरेकी हल्ल्याची झळ क्रिकेट जगतालाही बसली

December 8, 2008 2:59 PM0 commentsViews: 5

8 डिसेंबरमुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची झळ क्रिकेट जगतालाही बसली आहे. क्रिकेटमध्ये भारत सुपरपॉवर म्हणून उदयास येत होता. आणि त्यातचं मुंबई हल्ल्याची दुदैर्वी घटना घडल्यामुळे भारतातील एकूणच क्रिकेटला धोका निर्माण झाला आहे.मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इंग्लंडची टीमही हादरली. भारतातून लवकरात लवकर काढता पाय घेण्याचा विचार खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट बोर्डाला बोलून दाखवला. आणि इंग्लंड बोर्डानेही मग बीसीसीआयशी संपर्क साधून उरलेल्या दोन वन डे मॅच रद्द करण्याची विनंती केली. बीसीसीआयला ही विनंती मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता. पहिली टेस्ट 11 डिसेंबरला चेन्नईत होणार आहे. तर दुसरी टेस्ट मुंबईतच व्हायची होती. आणि ती ही दक्षिण मुंबईतल्या ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये. याच भागात ताज आणि ओबेरॉय ही दोन हॉटेल्स आहेत. जिथं दहशतवादी दोन दिवस तळ ठोकून होते.मुंबईतील टेस्ट आता मोहालीला हलवण्यात आली आहे. या अतिरेकी हल्यांमुळे मुंबईतील क्रिकेट मॅचच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उभं राहीलं आहे.

close