गप्पा कौन्सिलर माधुरी पुरंदरेंशी (भाग – 2)

December 1, 2008 8:02 AM0 commentsViews: 8

देशावर कोणतंही संकट आलं मग ते नैसर्गिक असो की मानव निर्मित असो, अशावेळी आपण काय करायचं, स्वत:ला आणि आपल्या बरोबरच्यांना कसं त्या संकटांपासून वाचवायचं याचं मार्गदर्शन ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये कौन्सिलर आणि सोशल सायंटीस्ट माधुरी पुरंदरे यांनी केलं.दहशतवादाशी सामना करतांना मुंबईकरांची मन:स्थिती थोडी नाजुक झाली होती. अशावेळी खचून न जाता पुढची वाटचाल करणं खूपच गरजेचं आहे. शासनाचे तर या घटनेतून डोळे उघडलेच आहेत. पण सामान्य लोकांनीही आता अशा दुदैर्वी संकटांसाठी स्वत:ला तयार ठेवलं कसं तयार ठेवलं पाहिजे यावर त्या बोलल्या. हे सांगत असताना माधुरी पुरंदरे यांनी सोशल ट्रेनिंगचं महत्त्व सांगितलं. माधुरी पुरंदरे यांनी ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये केलेलं मार्गदर्शन व्हिडिओवर पाहता येईल.

close