हा सूर स्वर्गीय … (भाग : 2)

December 2, 2008 6:12 AM0 commentsViews: 2

दहशतवादाच्या तांडवानं देशाचं वातावरण गढुळ झालं आहे. कधी आणि केव्हा एकदम अचानक काय होईल, याची कुणालाच शाश्वती नाहीये. अशा या वातावरणात लोकांच्या जखमी मनावर हळुवार फुंकर घालण्याचं काम केलं ते बासरीवादक विवेक सोनर यांनी. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये सुरुवातीला त्यांनी असा काही राग अहिर-भैरवमधला बासरीचा तुकडा वाजवला की ऐकणा-यांचे कान तृप्त झाले. विवेक गेली 21 वर्षं झाली बासरी वाजवताहेत. 11 वर्ष त्यांनी पं.हरीप्रसाद चौरसिया यांच्याकडे शिक्षण घेतलं आहे. पं.बिरजू महाराज, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याबरोबर त्यांनी कार्यक्रम केले आहेत. अशा या बासरीवादकाविषयी जास्त काही लिहिण्यापेक्षा बासरीच्या माध्यमातून त्यांनी जो प्रेक्षकाशी संवाद साधला आहे तो व्हिडिओवर ऐका.

close