मॅरेडोनाने दिली मोहन बागान क्लबला भेट

December 8, 2008 4:29 PM0 commentsViews: 3

8 डिसेंबर कोलकाताफुटबॉलच दैवत दिएगो मॅरेडोना सध्या भारत भेटीवर आहे. अगदी काही दिवसांसाठी कोलकात्याच्या भेटीला आलेल्या मॅरेडोनाला भेटून सगळेच खूशआहेत. तर मॅरेडोनाही या क्रेझी फुटबॉल शहराला भेट देऊन तितकाच आनंदीत आहे. काल रात्री आपल्या चाहत्यांना भेटल्यावर मॅरेडोनाने मदर तेरेसा यांच्या संस्थेला भेट दिली. तेथे तो मेघा नावाच्या मुलीला भेटला. मेघा सेरीब्रल प्लासी या आजाराने ग्रस्त आहे. मेघाने मॅरेडोनाला भारतीय क्रिकेट टीमची ब्ल्यू कॅप भेट दिली. त्यानंतर मॅरेडोनाने मोहन बागान फुटबॉल क्लबलाही भेट दिली. 12 वर्षांखालील मुलांसाठी तेथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. पण लोकांनी केलेल्या गर्दीमुळे मॅरेडोनाला तिथून लवकरात लवकर काढता पाय घ्यावा लागला.

close