कॉलेज फेस्टिवलची धूम

December 6, 2008 2:33 PM0 commentsViews: 15

युथ ट्यूबच्या या भागात आपण भेटलो बराडला. आयबीएन लोकमतच्या या स्टुडियो डिरेक्टरनं मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 59.hours.in ही वेबसाईट तयार केलीय. 59 तासांच्या झुंजार लढ्यासंदर्भातली सगळी माहिती या वेबसाईटवर पहायला मिळते.या दहशतवादी हल्ल्याचे फोटो, या हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना सलाम, असा हल्ला परत होऊ नये यासाठी घ्यायची काळजी अशी सगळी माहिती या वेबसाईटवर पहायला मिळते. यातील किलर या पेजवर या हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देण्यात आली आहे. 59 स्पेशल या पेजवर दहशतवाद या विषयातील तज्ज्ञांचे लेख वाचायला मिळतील. असा हल्ला जर परत झाला तर हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. तेथे सगळ्या हॉस्पिटल आणि ब्लड बँकांचे नंबर मिळू शकतील. परत असा हल्ला होऊ नये या दृष्टीनं जागरूकता निर्माण करण्यासाठी मी ही साईट बनवली असं योगशनं सांगितलं.यानंतर आम्ही भेटलो mumbaiblooddonors.org हे वेब पोर्टल सुरू करणार्‍या नोएल सिक्वेराच्या ग्रुपला. नोएलची एक मैत्रीण काही दिवसांपूर्वी आजारी पडली आणि तिला रक्त मिळवण्यासाठी बरीच शोधाशोध करावी लागली. असा अनुभव इतर कोणाला येऊ नये म्हणून त्यांनी ही साईट ' सुरू केली. आपल्या जवळचा रक्तदाता या साईटवरून शोधता येतो. सगळ्यात जवळचा रक्तदाता या साईटवर सगळ्यात आधी दिसतो. या पोर्टलला मायक्रोसॉफ्टचा पुरस्कार मिळालाय. पण या साईटचा ज्यांना उपयोग झालाय, त्याचं समाधान म्हणजे या ग्रुपसाठी सगळ्यात मोठ पारितोषिक आहे.यानंतर आमची युथ ट्यूबची टीम पोचली सायनच्या एसआयइएस कॉलेजमध्ये. तिकडे सुरू असणारी 'व्हिजन्स' या कॉलेज फेस्टिवलची धूम आम्ही तुमच्यापर्यंत पोचवली. या फेस्टिवलची थिम आहे 'बॉर्न टू बी वाईल्ड.' फेस्टिवलचा हाच खुमार रुईया कॉलेजवरही चढतोय, तिथेही 'आरोहन' या कॉलेज फेस्टची जोरदार तयारी सुरू आहे. व्हीईएस कॉलेजमध्येही 'इम्प्रेशन' या फेस्टीवलची तयारी सुरू आहे. या सगळ्या कॉलेज फेस्टची तयारी, मस्ती, स्पॉन्सर्स मिळवण्यासाठी चाललेली धडपड हे सगळं युथ ट्यूबच्या या भागात पहायला मिळाली.युथ ट्युबचा हा सगळा एपिसोड तुम्ही सोबतच्या व्हिडियोवर पाहू शकता

close