जयंत पाटील नवे गृहमंत्री

December 9, 2008 9:35 AM0 commentsViews: 68

9 डिसेंबरनव्या मंत्रीमंडळाचं खाते- वाटप मंगळवारी संध्याकाळ पर्यंत जाहीर करण्यात येईल असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलयं. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांची मंत्रीपदाची खांदेपालट निश्चित केल्याचं समजतंय. सध्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद तर उर्जामंत्रीपद सांभाळणार्‍या दिलीप वळसे-पाटीलांकडे अर्थमंत्रीमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना आरोग्य विभागाचं मंत्रीपद, राजेश टोपे यांच्याकडं वैद्यकीय आणि उच्चतंत्र शिक्षण खातं, बाळासाहेब थोरात यांच्याकडं महसूल खातं, सुनील तटकरे यांच्याकडं ऊर्जा खातं तर डॉ. विमल मुंदडा यांच्याकडं एमएसआरडीसी देण्यात आलंय. आधी असलेलं उद्योग मंत्र्याचं खातं आपल्याकडेच ठेवण्याचं सूतोवाचही चव्हाण यांनी यावेळी केलय. "उद्योग हा माझा आवडता विषय आहे. गेले चार वर्षं त्या खात्यात मी चांगलं काम केलं आहे. हे खातं माझ्याकडेच ठेवायचं का ? याचा निर्णय सहकार्‍यांशी चर्चा करून घेतला जाईल" असं ते म्हणाले.

close