देशभर बकरी ईद साजरी

December 9, 2008 8:32 AM0 commentsViews: 4

9 डिसेंबरआज सर्वत्र बकरी ईद साजरी होतेय. दिल्लीतील जामा मशीदीत मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येनं विशेष नमाज अदा केला. या दिवशी बकर्‍याची कुर्बानी दिली जाते. पण याला अपवाद ठरलंय, पंढरपूर. आज एकादशीही असल्यानं इथले मुस्लीम बांधव बकर्‍याची कुर्बानी न देता केवळ नमाज पठण करुन ईद साजरी करताहेत. या दिवशी कुर्बानी देऊ नये असा फतवाच त्यांनी काढलाय. दुसरीकडं आजच्या ईदवर सावट आहे, ते मुंबईवरच्या दहशतवादी हल्याचं. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ईद अत्यंत साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन विविध मुस्लीम संघटनांनी केलंय. बर्‍याच मुस्लीम संघटनांनी दहशतवादाचा निषेध म्हणून हातावर काळी पट्टी बांधून येण्याचं आवाहन केलं होतं.

close