कचराकुंडीत सापडलेल्या बाळावर नायरमध्ये उपचार

December 9, 2008 9:10 AM0 commentsViews: 10

9 डिसेंबर मुंबईअलका धुपकरमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी प्रत्येक मुंबईकराने माणूसकी दाखवत एकमेकांना साथ दिली. पण याच मुंबईमध्ये नुकत्याचं जन्मललेल्या एका मुलीला कचरा कुंडीत फेकून देण्याचा अमानुष प्रकार त्याच रात्री घडला.26 नोव्हेंबरच्या रात्री हॉटेल ताज, ओबेरॉय आणि मुंबईत इतर ठिकाणी अतिरेक्यांच्या रूपानं मृत्यूचं तांडव सुरू होतं. त्याच रात्री दहिसरला एक मुलगी जन्माला आली. आणि जन्म घेतल्यानंतर लगेचच तिचं दुदैर्व सुरू झालं. जन्मानंतर तिला कच-याच्या पेटीत फेकून देण्यात आलं. केवळ आयुष्याची दोरी बळकट म्हणून ती वाचली. या अनाथ मुलीला दत्तक घेण्याचं आवाहन आता करण्यात आलंय…जन्माला आल्यापासून तिचा प्रवास झाला तो कचरा पेटी ते हॉस्पिटल.आईच्या कुशीची उब तिला मिळालीच नाही.नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागाच्या मशिनची उष्णता तिला दिली जात आहे.मेंदूभोवती झालेल्या जखमांतून ती कशीतरी वाचली आहे. पहिल्यांदा भगवती हॉस्पिटल आणि त्यांनतर आता नायर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार केले जात आहेत. नायर हॉस्पिटलच्या सर्जन डॉ. शालिका जयस्वाल सांगतात, ह्या मुलीच्या मेंदूची कवटी फ्रॅक्चर झाली असून आता मेंदूवर ट्रिटमेंट चालू आहे. यानंतर पुढचे तीन महिनेतरी तिला औषधं घ्यावी लागणार आहेत. 10 दिवसांच्या चिमुकलीवरचे उपचार संपले की तिला अनाथाश्रमात पाठवलं जाणार आहे. सध्या नायर हॉस्पिटलमधल्या नर्सच या मुलीची काळजी घेत आहे. आणि अजून तिचं नावही ठेवलेलं नाही. तिला दत्तक घ्यायला कुणी तयार असेल तर त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. नायर हॉस्पिटल- मुंबई,एमएसडब्ल्यू विभाग, फोन नं – 23081490- 214, 215

close