भावंडांची भांडणं (भाग : 1 )

December 11, 2008 9:57 AM0 commentsViews: 13

' टॉक टाईम ' मधला विषय तुमच्या आमच्या घरातला होता. विषय होता भावंडांची भांडणं. याच विषयातल्या काही महत्त्वाच्या पैलूंवर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रवीन्द्र अभ्यंकर यांनी प्रकाश टाकला. डॉ. रवीन्द्र अभ्यंकर सांगतात, " कुटुंबात जेव्हा एखादं नवीन मूल जन्माला येतं तेव्हा मोठ्या भावंडाला थोडंसं असुरक्षित वाटतं. कारण तोपर्यंत आई-वडिलांचं प्रेम मोठ्या भावंडाला मिळालेलं असतं. घरातल्या प्रत्येकाचा तो मुलगा लाडका असतो. नवीन भावंड जन्माला आल्यावर आपल्या प्रेमात नवा वाटेकरी आल्याची भावना मोठ्या भावंडामध्ये निर्माण होते. काही वेळा तर लहान भावंडाला मारलं जातं, चिमटे काढले जातात. अशावेळी पालकांनी मुलांची समजूत काढली पाहिजे. दोन्ही मुलं आपल्यासाठी समान असल्याचं पालकांनी मुलांना समजून दिलं पाहिजे." मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलेली माहिती व्हिडिओवर पाहता येईल भांडणं का होतात ?गैरसमज.मतभेद .आवडता-नावडता अशी समजुत . मुलगा-मुलगी असा भेद. अन्यायाची भावना . स्पर्धा . असुया . असुरक्षितता . मुलांकडे दुर्लक्ष . मुलांना गृहित धरण्याची प्रवृत्ती . दोन मुलांमधली तुलना . वयानुसार होणारी भांडणं Preschool age group — नकळत्या वयात.School going — शाळकरी वयात.Grown ups– वयात आलेली मुलांमध्ये.वयात जास्त अंतर असेल तर.मधल्या मुलाचे प्रश्न वेगळे.मोठ्या मुलाला जबाबदारीबरोबरच, दुर्लक्ष झाल्यासारखं वाटणं.भांडणं होण्याची कारणं आई-बाबांच्या संवादाकडे, भांडणाकडे मुलांचं लक्ष असतं. मुलं आई-बाबांचं अनुकरण करतात. पुस्तकं, खेळणी, कपडे वापरण्यावरून भांडणं होतात.कोणाचं ऐकून घेणं मुलांना आवडत नाही.त्याच्याकडे आहे पण माझ्याकडे नाही हा नेहमीचा मुद्दा.मुलगा-मुलगी भावंडांमधले प्रश्न वेगळे असतात.एकुलत्या एक मुलाला नंतर धाकट्याबरोबर जमवणं कठीण जातं.एकत्रित जडणघडणीमुळे जुळ्या भावंडांमधे नातं अधिक घट्ट असतं.सावत्र भावंडांमधे मैत्री, भांडणं असतात, शिवाय आई किंवा वडील वेगळे असल्यानं मुद्दे आणखी वेगळे आहेत.भावंडांमधील भांडणं टाळण्यासाठी काय करावं?भावंडांमध्ये तुलना करू नका.मुलगी-मुलगा असा भेद करू नका.अनावश्यक आणि कठोर शिस्त लावू नका.चांगले आदर्श ठेवा.स्पर्धा न वाढवता सहकार्य-मदतीची भावना वाढवा.मुलांना त्यांच्या जबाबदार्‍या समजावून सांगा.

close