तणावावर मात (भाग : 1)

December 12, 2008 1:35 PM0 commentsViews: 5

सध्या आपल्या आजुबाजुला इतक्या वाईट घटना घडत आहेत की कुठेतरी त्या वाईट घटनांचा आपल्यावर ताण पडत असतो. त्या घटनांतून कसं बाहेर यावं याची चिंता लागून असते. मुळातच हे ताण काय असतात, ते कोणत्या प्रकारचे असतात, आलेल्या ताणांवर मात कशी करायची यावर चर्चा करण्यासाठी ' टॉक टाइम 'मध्ये मनसोपचार तज्ज्ञ हेमांगी ढवळे आल्या होत्या. आपल्याला ताण येतो ते चटकन कळत नाही. त्यावर मानसोपचारतज्ज्ञ हेमांगी ढवळे सांगतात, " ताण हा मानसिक ताण आणि शारीरिक ताण अशा दोन प्रकारचा असतो. शरीर आणि मन हे एकमेकांपासून कधीच दूर करता येत नाही. शारीरिक ताणाचा मनावर परिणाम होतो आणि मानसिक ताणाचा शरीरावर परिणाम होतो. मानसिक तणामुळे कंबर दुृखणं, पोटात दुखणं, डोकं दुखणं हात-पाय दुखणं असं होतं. ताणामुळे पोटातल्या अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं, पोटात जळजळतं, खाल्लेलं पचत नाही, छातीत धडधडतं, हात-पाय कापायला लागतात, चक्कर यायला लागते, आपण पडणार की काय अशी आपली अवस्था होते, नर्व्हर्स सिस्टीमवर परिणाम होतो, अशावेळी लोकांनी घाबरायचं नाही. तर मानसोपचार तज्ज्ञ, फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा." मानसोपचार तज्ज्ञ हेमांगी ढवळे यांनी तणावावर मात करण्यासाठी उपायही सांगितलेत. ते व्हिडिओवर पाहता येतील.

close