गप्पा सुनील पडवळशी (भाग – 2)

December 13, 2008 1:35 PM0 commentsViews: 6

26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध भारतातला प्रत्येक नागरिक आपापल्यापरिनं करत आहे. सामान्य नागरिक दहशतवादाविरूद्धच्या शांतता मोर्चांमध्ये उपस्थिती लावून अतिरेकी कारवायांचा निषेध करत आहेत, तर कलाकार मंडळी आपल्या कलांमधून. नुकतच जहांगिर आर्ट गॅलरीत सुनील पडवळ यांचं ' मायोपिआ ' या नावानं चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. संपूर्ण भारतात घडणा-या दहशतवादी घटनांचा विशेषत: काश्मिरमधल्या दहशतवादाचा चित्रांच्या माध्यमातून निषेध केला होता. त्या चित्रांना कॅनव्हासवर उतरवणारा चित्रकार सुनील पडवळ ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये आले होते. सामाजिक विषयांना घेऊन चित्रांची प्रदर्शनं भरवणं ही त्यांची खासियत आहे. अशा आगळ्यावेगळ्या चित्रकाराशी मारलेल्या गप्पा व्हिडिओवर पाहता येतील.

close