हिंदुजा कॉलेजमध्ये धमाल

December 13, 2008 3:02 PM0 commentsViews: 18

यूथ ट्युबच्या या भागात आमची रिपोर्टर प्रियांका पोहचली हिंदुजा कॉलेजमध्ये. इथे आपण ओळख करून घेतली रोट्रॅक्ट क्लबची. हिंदुजा कॉलेजमध्ये 30 दिवसात 30 इव्हेंट्स ऑर्गनाईझ करण्याचं करण्याचं अवघड चॅलेंज इथल्या मुलांनी घेतलंय. डिसेंबरचा महिना आहे आणि अर्थातच सगळ्या कॉलेजमध्ये इंटर कॉलेज फेस्टिव्हलची तयारी सुरू आहे. मग हिंदुजा कॉलेज तरी याला अपवाद कसं असेल ? इथे फॅशन शोची प्रॅक्टिस करणार्‍या मुलांबरोबर यूथ ट्युबच्या टीमनं भरपूर गप्पा मारल्या. खास यूथ ट्युबच्या दर्शकांसाठी या मुलांनी फॅशन शोची झलकही दाखवली. यानंतर आपण गप्पा मारल्या इथली सालसा डान्स मास्टर खुर्दे बरोबर. सालसाचं चांगलं प्रशिक्षण घेऊन आपल्या इतर सहकार्‍यांसमावेत तिनं डान्स कंपनी सुरू केली आहे. खास यूथ ट्युबच्या प्रेक्षकांसाठी तिनं सालसाच्या टिप्सही दिल्या. यानंतर हिंदुजाच्या मुलांबरोबर आपण पॉकेटमनीवर भरपूर गप्पा मारल्या. पॉकेट मनी कसासाठी लागतो ? इथपासून तो कसा खर्च करायचा, या सगळ्यावर मुलांनी बिनधास्त गप्पा मारल्या. राकेशनं तर त्याचा खास स्ट्रीट डान्संही करून दाखवला.यूथ ट्युबच्या टीमनं हिंदुजाच्या कम्पसमध्ये केलेली ही सगळी मजा तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता

close