पुरूष वंध्यत्वावरचे उपचार (भाग : 1)

December 16, 2008 10:31 AM0 commentsViews: 31

कोणत्याही जोडप्याला जेव्हा मूल होत नाही, तेव्हा आपसूकच बोटं स्त्रीकडे वळतात. पण अशावेळेला पुरुषांमध्येही काही कमतरता असू शकते. त्याच्यामध्येही वंध्यत्व असू शकतं. पुरूष वंध्यत्व काय असतं, त्याच्यावर मात कशी करता येऊ शकते, यावरचे उपचार काय यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर यांनी मार्गदर्शन केलं. वंध्यत्वावर डॉ. नंदिता पालशेकर सांगतात, " आपल्या देशात 10 ते 15 टक्के लोकांमध्ये वंध्यत्वाची समस्या आढळून येते. वंध्यत्वाची कारणं पहायला गेलीत तर पुरुषांमध्यल्या वंध्यत्त्वामुळे 30 ते 35 टक्के जोडप्यांना मूल होत नाही. ब-याच वेळा तपासणीसाठी स्त्रियाही येतात. जेव्हा त्या स्त्रिच्या नव-यालाही बोलावलं जातं. दोघांची वंध्यत्वाची तपासणी केली जाते. जर स्त्रीत दोष असेल तर तिची आणि जर पुरुषात दोष असेल तर त्यावर उपचार केले जातात. पुरुषांमधल्या वंध्यत्वातली तपासणी करताना सिमेन अ‍ॅनालिसीस केलं जातं. त्यातून आम्ही सिनेम कल्चर करतो. कधी सिमेनला इन्फेक्शन झाल्यानेही पुरुषांमधल्या वंध्यत्वाचा त्रास वाढतो. तर अशा चाचण्या करून आम्ही पुरुषांमधल्या वंध्यत्वावर उपचार करतो. पुरुषांमध्ये स्पर्मची क्वालिटी कमी झाल्यानंही वंध्यत्व येतं. इन्फेक्शन, ताप, मद्यपान, धूम्रपान, अयोग्य व्यायाम,डायबिटीस ही स्पर्मची क्वालिटी कमी होण्याची कारणं आहेत. स्पर्म काऊण्ट वाढवण्यासाठी व्हिटामीन तसचं फर्टिलिटी सप्लिमेंट घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. डॉ. नंदिता पालशेतकर यांनी पुरुष वंध्यत्वाबाबत सांगितलेली माहिती व्हिडिओवर बघता येईल.

close