विद्यार्थ्यांना मिळणार संरक्षणाचं ट्रेनिंग

December 9, 2008 9:30 AM0 commentsViews: 4

9 डिसेंबर मुंबईरोहिणी गोसावी26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यात निर्दोष लोकांचा बळी गेला. अनेकांची आयुष्य उद्धवस्त झाली. यातून अनेकांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले. मुंबईकर कधी नव्हे तो इतका चिडला. आणि त्यातून सामान्य माणसालाच स्वत:च्या संरक्षणाचं ट्रेनिंग का देवू नये हा मुद्दा समोर आला आणि त्याची सुरुवात केली आहे मुंबईतल्या मॅनेजमेंट कॉलेजनं.26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेला आतंकवादी हल्ला कोणीही विसरू शकत नाही.हल्ल्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याचं विश्लेषण झालं. प्रत्येकानं आपली जबाबदारी दुस-यावर ढकलली. सामान्य माणसालाच जर त्याच्या बचावाचं आणि सुरक्षेचं ट्रेनिंग असतं तर इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान काही प्रमाणात टळलं असतं. ही सुरुवात आता विद्यार्थ्यांपासून होत आहे. के. जे. सोमय्या मॅनेजमेंट कॉलेजनं यात पुढाकार घेतला आहे.लवकरच या विद्यार्थ्यांना हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे.याबाबत के. जे. मेहता मॅनेजमेंट कॉलेजचे डायरेक्टर, प्रो. सुरेश घई सांगतात,ज्यावेळी मुंबईवर हल्ले झाले त्यावेळी सामान्य नागरिक इकडे तिकडे धावत राहिले. जर त्यांना अशाप्रकारच्या हल्ल्याबाबत माहिती असली असती तर कमी नुकसान झालं असतं. प्रत्येक नागरिकांना अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. या ट्रेनिंगमध्ये विद्यार्थ्यांना सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. या ट्रेनिंगसाठी मिलिटरी आणि पोलीस खात्याकडून मदत घेण्यात येणार आहे. म्हणून हे ट्रेनिंग समाजाला उपयोगी ठरेल, याची खात्री मॅनेजमेंटला वाटत आहे. आता मुंबईतल्या सगळ्याच मॅनेजमेंट कॉलेजमध्ये हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे. जनतेची रक्षा करणं हे पोलीस आणि सैन्याचं कर्तव्य असलं तरी आपलं संरक्षण स्वत:च करणं आणि स्वत: जागृत राहणंही तितकंच महत्वाचं असतं.

close