भीती इंग्रजीची घालवाल कशी ? – भाग 2

December 17, 2008 2:26 PM0 commentsViews: 32

इंग्रजी कसं बोलावं याचा न्यूयगंड अनेकांच्या मनात असतो. बहुतेकदा कोणताही व्यवहार करताना ही समस्या आपल्याला जाणवते. तर ही भीती घालवायची कशी, या न्यूनगंडावर मात कशी करायची यावर मार्गदर्शन ' टॉक टाइम 'मध्ये करण्यात आलं. ' भीती इंग्रजीची ' या विषयावर डॉमनिक कोस्टाबीर या कार्पोरेट ट्रेनर मार्गदर्शन केलं. डॉमनिक कोस्टाबीर हे हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे मुख्य आहेत. " इंग्रजी भाषेतून आपले विचार मांडता यावे, असं प्रत्येकाला वाटतं. पण ते होत नाही. असं का होतं तर… आपलं इंग्रजी ऐकून लोकं हसणार तर नाही.., बोलताना आपलं इंग्रजी व्याकरणातलंअज्ञान तर कळून येणार नाही… अशा एक ना अनेक प्रश्नामुळे बोलणा-याची भीतीनं गाळण उडते. असं होऊ नये याकरिता ग्रुपमध्ये नेहमी इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा. इंग्रजी बोलताना न्यूनगंड बाळगायचा नाही. रोजचं इंग्रजी वर्तमानपत्र वाचायचं. आपण मराठी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेतून बोलतना नेहमी वापरणा-या शब्दांना इंग्रजीत काय प्रतिशब्द आहे तो शोधून काढून पाठ करून ठेवायचा. इंग्रजी कार्यक्रम, चित्रपट,बातम्या बघायचे. कोणताही इंग्रजीशब्द त्याच्या स्पेलिंग आणि अर्थासकट पाठ करून ठेवायचा, " अशी महत्त्वपूर्ण माहिती डॉमनिक कोस्टाबीर यांनी सांगितली. डॉमनिक कोस्टाबीर यांनी इंग्रजी भाषेबाबत केलेलं मार्गदर्शन व्हिडिओवर बघता येईल.कसं सुधरवाल इंग्रजी * इंग्रजी कार्यक्रम,चित्रपट,बातम्या बघा. * रोज चार नवे शब्द शिका. * न घाबरता बोलायला सुरुवात करा. * घरातल्या लोकांशी,मित्रांशी बोला. * मोठ्यानं वाचा म्हणजे उच्चार कळतील. * आरशासमोर उभं राहुन बोला. * शब्दांची फोड करून वाचा. * डिक्शनरीचा वापर करा. * काही शब्दांचा उच्चार स्पेलिंगप्रमाणं होत नाही. * एक वचन आणि अनेक वचनातील फरक लक्षात घ्या. * इंग्रजीत काळालाही महत्त्व आहे. तेव्हा काळ लक्षात घेऊन इंग्रजी वाचा.

close