राणेयांच्यासोबतचे राजकीय संबंध संपले- वडेट्टीवार

December 9, 2008 9:34 AM0 commentsViews: 7

9 डिसेंबर नागपूरविजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी नारायण राणे यांनी केलेली विधानं खोडून टाकली.तसंच नारायण राणेयांच्यासोबतचे आपले राजकीय संबंध संपले आहेत असं सांगितलं. अशोक चव्हाण मंत्रिमंडळात वडेट्टीवार त्यांची राज्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. आपण नारायण राणेंना विचारून मंत्रीपद घेतलं नाही. तसंच कोणतही सरकार सांगून पाडता येत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

close